पंढरपूर : अपघातात पंढरपूर तालुक्यातील तीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातच विजेच्या धक्क्याने (Electric Shoc ) दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एकाच दिवशी पंढरपूर तालुक्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
होळी आणि धुळवड सणाचा जल्लोष सुरु असताना पंढरपूर तालुक्यात दोन वाईट घटना घडल्या आणि तालुक्यावर एक दु:खाची छटा पसरली. (Pandharpur accident)धुळवडीच्या दिवशी देवदर्शन करण्यासाठी सांगोला तालुक्यातील सोनंद येथे गेलेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आणि पंढरपूर तालुक्याला धक्का बसला. तिघेही तरुण खर्डी येथील असल्याने खर्डी गाव तर शोकात बुडाले. ऐन सणाच्या दिवसात या गावाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. या अपघाताचे दु:ख व्यक्त होत असतानाचा पंढरपूर तालुक्यातील चळे येथेही एक दुर्घटना घडली आणि यात दोन मजुरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Death of two laborers) समोर आली.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील आनंदा शिवाजी मोरे (वय ३६) आणि राजेंद्र गोविंद सातपुते (वय ३८) हे दोघे गावातील एका शेतकऱ्याकडे मजुरीने काम करीत होते. भीमा नदीच्या काठावर पाण्यासाठी ते या शेतकऱ्याचा नवीन विद्युत पंप जोडण्याचे काम करीत असताना ही दुर्घटना घडली. पाण्यात सोडण्याची मोटार ते नदीत सोडत असतानाच अचानक केबलमधून विद्युत पुरवठा सुरु झाला आणि दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला. पाणी आणि पायाखाली चिखल असल्याचे या धक्क्याची तीव्रता आणखीच वाढली. विजेचा जोरदार धक्का बसताच दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आणि चळे परिसर हादरून गेला.
विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर तातडीने या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा कसा सुरु झाला याचे अनेकांना कोडे असून तपासात या बाबी समोर येणार आहेतच परंतु ऐन सणाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनात पाच जणांचा मृत्यू झाल्याने होळी आणि धुळवड पंढरपूर तालुक्यासाठी दु:खाची ठरून गेली आहे. चळे यथील घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला आहे. ( Two laborers death in electric shock) या घटनेने चळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा :
- पंढरपूरच्या 'त्या' सायबाला अटक !
- भरधाव धावणाऱ्या कारला लागली आग आणि --
- पुन्हा कोरोना, केंद्राच्या राज्य सरकारला सूचना !
- "या" शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार !
- अपघात ! पंढरपूर तालुक्यातील तीन युवक ठार !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !