हैद्राबाद : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आगीच्या घटना वाढत असताना हैद्राबाद येथे भंगार दुकानाला लागलेल्या आगीत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Hyderabad fire) घडली आहे.
उन्हाळा सुरु होताच तापमानात मोठी वाढ होऊ लागली असून धावती वाहने पेटण्याच्या घटना सुरु झाल्या आहेत. अशातच हैदराबाद येथील भोईगुडा भागात एका भंगार दुकानाला अचानक आग लागली आणि या आगीत तब्बल ११ कामगार जळून मेल्याची अत्यंत वाईट आणि काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे. बिहारी कामगार भंगार दुकानात गाढ झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत हे अकरा कामगार होरपळून मृत्युमुखी पडले. एक कामगार जीव वाचविण्यात यशस्वी झाला परंतु तो गंभीररित्या भाजला गेला आहे. उर्वरित अकरा कामगार मात्र या आगीत जळून मृत्युमुखी पडले आहेत. पहाटेच्या वेळेस आग लागल्याने कामगार झोपेत होते त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले नाही. जेंव्हा आले तेंव्हा वेळ निघून गेली होती.
आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही परंतु ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशामक दल धावले आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत प्रचंड नुकसान झाले होते आणि ११ कामगारांचा जीव गेला होता. (Eleven workers died in the fire) आगीची तातडीने चौकशी सुरु करण्यात आली असून या चौकशीच्या नंतर आगीचे कारण समोर येईल. ही आग लागली की लावली गेली याबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. अकरा कामगार मृत्युमुखी पडल्याने मात्र प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे देखील वाचा :>>


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !