BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मार्च, २०२२

कर्मचाऱ्यानेच लांबवले एटीमचे सोळा लाख !

 


पंढरपूर : बँकेच्या एटीम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम करणाऱ्यानेच तब्बल सोळा लाखावर डल्ला मारला (Sixteen lakh fraud असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकाराने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.


बँकेच्या एटीममधून ( ATM  Machine)वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या होत असतात, कधी कुणीतरी कुणाची फसवणूक करते तर कधी मशीन फोडले जाते, कधी अख्खे एटीम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न करतो पण पंढरपूर येथे 'चौकीदारही चोर है' असे चित्र उघडकीस आले आहे. विविध ठिकाणी असलेल्या एटीम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम काही ठराविक व्यक्तींवर सोपवलेले असते. या मशीनमध्ये रक्कम भरण्याची जबाबदारी असलेल्यानेच बँकेची सोळा लाखाची रक्कम लंपास केली आणि पुन्हा कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला.


सी.एम.एस इन्फो सिस्टीम लिमिटेड सोलापूर या कंपनीचा राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकेशी करार आहे त्या प्रमाणे ही कंपनी बँकाकडून रक्कम प्राप्त करून ठरवून दिलेल्या एटीम मशीनमध्ये भरण्याचे काम करीत असते. यासाठी कर्मचारी आणि वाहन या कंपनीचेच असते. याच कंपनीकडे एटीम कस्टोडियन म्हणून पंढरपूर इसबावी येथील आशिष मोहन दामजी हा काम करीत आहे. आशिष आणि अन्य काही कर्मचारी यांनी पंढरपूर येथील स्टेट बँकेतून मशीनमध्ये भरण्यासाठी ३२ लाखांची रक्कम घेतली. ही रक्कम पंढरपूर येथील इसबावी आणि सांगोला तालुक्यातील कडलास येथील एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी बँकेने दिली होती. 


इसबावी येथील विसावा मंदिराजवळ असलेल्या एटीएममध्ये १६ लाख रुपये भरणे अपेक्षित होते पण येथे १४ लाख रुपयेच भरले गेल्याचे कंपनीच्या लक्षात आले त्यामुळे कंपनीने याबाबत संबंधित आशिष याच्याकडे चौकशी केली. हा प्रकार लक्षात आलेला असतानाही आशिष याने दिशाभूल करणे सुरु केले. दोन लाखांची रक्कम चुकून दुसऱ्या एटीएम मशीनमध्ये भरली गेली असते अशी बतावणी देखील त्याने केली. त्यानंतर महूद येथील एटीएम मशीनमध्येही ५ लाख रुपये कमी भरले असल्याचे निदर्शनास आले. हा  काहीतरी गैरप्रकार असल्याचे कंपनीला जाणवताच त्यांनी सगळ्याच एटीएम मशीनची तपासणी केली असता तब्बल १६ लाख १६ लाख ११ हजार ५०० रुपयांचा घपला केला असल्याचे उघड झाले. 


कंपनीने आशिष दमाजी याच्याशी संपर्क करून चावीची मागणी केली असता त्याने चावी देण्यास नकार तर दिलाच पण सदर रक्कम आपण घेतली असल्याचे कंपनीकडे कबूल देखील केले. (Atm employee stolen sixteen  lakhs सदर रक्कम आपण घेतली असून ती उद्या परत करतो असे त्याने सांगितले पण नंतर मात्र तो बेपत्ता झाला असून त्याने आपला फोन देखील बंद ठेवला आहे अशा प्रकारची तक्रार कंपनीने पंढरपूर पोलिसात दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी आशिष दमाजी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने बँक (Bank ATM) वर्तुळात खळबळ उडाली आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !