पंढरपूर : शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज काढून कोट्यावधींचा मलिदा लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून (Bogus loans in the name of farmers) सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी, नांदोरे, पेहे आणि माळशिरस तालुक्यातील जांभूड, नेवरे अशा गावातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन संच खरेदीच्या नावाने परस्पर बोगस कर्ज प्रकाराने करण्यात आली आणि सुमारे तीन कोटींचा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची गंभीर आणि धक्कादायक तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने आणि शेतकरी बांधवांनी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे असलेल्या एका राष्ट्रीयकृत बँकेतून हा प्रकार (Big fraud)घडला असून २०१४ ते २०१७ या काळात श्रीपूर येथील एका ठिबक संच विक्रेत्याच्या मदतीने हा घपला करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन संच खरेदीसाठीची बोगस कर्ज प्रकरणे करून कोट्यावधी रुपये लाटले गेले आहेत. त्यामुळे बँकेच्या त्यावेळच्या शाखाधिकारी यांच्यावर तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन देखील केले आहे.
शेतकऱ्यांना धक्का !
आपल्या नावावर मोठ्या रकमेची कर्जे उचलली असल्याचे संबंधित शेतकरी यांना माहित देखील नाही. पाच वर्षांपूर्वी न घेतलेल्या कर्जाबाबत शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा आल्या आणि कर्ज भरण्यास सांगण्यात आले तेंव्हा अनेक शेतकऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या नावाने बँकेत कर्ज असल्याचे दिसून आले आणि एकूण प्रकार (Solapur District Crime) उघडकीस आला.
फसवणुकीचा मोठा प्रकार !
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून मोठी रक्कम लाटण्यात आली असून हा फसवणुकीचा मोठा प्रकार असण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत काही शेतकरी पुढे आलेले आहेत परंतु आणखी अशा किती शेतकऱ्यांच्या नावावर बोगस प्रकरणे करण्यात आली आहेत आणि नेमके किती कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे हे चौकशी आणि तपासताच समोर येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा आल्या त्यांची तर झोप उडाली आहे. आपण एक रुपयांचे देखील कर्ज घेतले नसताना आपल्या नावावर कर्ज दाखविण्यात आले आहे (Fraud by taking out loans in the name of farmers) याचा मोठा धक्का या शेतकऱ्यांना बसला आहे.
'रयत क्रांती' आक्रमक !
बोगस कर्जाच्या या प्रकरणी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून त्यांचा आवाज बनून रयत क्रांती संघटना समोर आली आहे. तत्कालीन बँक अधिकारी आणि इतर संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल बिडवे यांनी तसेच अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी अडचणीत !
शेतकरी वर्ग आधीच वेगवेगळ्या संकटात आणि अडचणीत सापडत असताना या प्रकरणाने तो अधिकच अडचणीत आला आहे. कधीही न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची नोटीस बँकेने त्यांना दिली आहे. शिवाय या प्रकाराने कारण नसताना हे शेतकरी 'थकबाकीदार" (Defaulter farmers) म्हणून गणले जात आहेत आणि त्यांना इतर बँकाही पीक कर्ज देत नाहीत. सदर प्रकरण मोठे असण्याची शक्यता असून चौकशीनंतर मोठा घोटाळा आणि फसवणूक समोर येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !