BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२२

बारा वर्षापासून सगळ्यांचे लसीकरण करणार !

 


नवी दिल्ली : येत्या १६ मार्चपासून सर्वांसाठी लसीकरण हा नवा कार्यक्रम सुरु करण्यात येणार असून बारा ते चौदा वयोगटातील मुलांना कोरोना लस (Vaccination for 12 to 14 year olds) दिली जाणार आहे. 


कोरोना लसीची निर्मिती झाल्यानंतर ती वयोगटाच्या टप्प्याटप्प्यानुसार देण्यात आली. शासनाने आवाहन करूनही आणि लस मोफत असतानाही अजूनही लाखो  लोक लसीकरणापासून दूर आहेत. लसीबाबत अनेक गैरसमज असल्याने आणि नंतर कोरोनाचा (Corona ) प्रभाव कमी होताना दिसू लागताच लस न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला. आता तर कोरोना जवळपास संपुष्टात आल्याने लस घेण्यास नागरिक उत्सुक दिसत नाहीत तथापि कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. 


देशात वेगाने लसीकरण झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Corona's third wave) निष्प्रभ ठरली आणि वेगाने तिला ओहोटी देखील लागली. तिसरी लाट ओसरत असली तरी शासनाने लसीकरणाचा नवा कार्यक्रम आयोजित केला आहे. देशात आता १२ ते १४ वयातील मुलानाही लस देण्यास सुरुवात करण्यात येत असून साठ वर्षे वयाच्या वरील सर्वच नागरिकांना बुस्टर डोस देण्यासही मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडवीय यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. येत्या १६ मार्चपासूनच हा नवा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. त्यामुळे आता १२ वर्षापासून पुढील वयाच्या सर्वांसाठीच लसीकरण खुले असणार आहे. 


 मुलांसाठी कार्बोव्हॅक्स !

१२ ते १४ वयोगटातील मुलांना 'कार्बोव्हॅक्स' ही लस देण्यात येणार आहे. हैदराबाद येथील बायोलॉजिकल इव्हॅन्स फार्मा कंपनीने कार्बोव्हॅक्स ही लस बनवली असून ती बारा ते चौदा वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. सदर वयोगटातील मुलांचे आणि साठ वर्षावरील नागरिकांनी देखील लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.   


सरसकट बूस्टर डोस !

बारा ते चौदा वर्षे वयाच्या मुलांचे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने आता बारा वर्षांपासून सगळ्यांनाच ही लस घेता येणार आहे.  साठ वर्षे वयाच्या वरील नागरिकांना इतर गंभीर आजार आहेत त्यांना आणि फ्रंट लाईन वर्कर्स याना सद्या बूस्टर डोस दिला जात आहे पण आरोग्य मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार साठ वर्षावरील सर्वच जेष्ठ नागरिकांना सरसकट बूस्टर डोस घेता येणार आहे.  त्यामुळे साठ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


हे देखील वाचा : >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !