BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२२

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात !

 



सोलापूर : एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला कोंडीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात ( Big Accident )  पाच ते आठ  वारकरी मृत्युमुखी पडले आहेत तर जवळपास ४० भाविक जखमी झाले आहेत. 


आज आमलकी एकादशी असल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविक पंढरीकडे (Pandharapur) जात आहेत. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून पंढरपूरकडे निघालेले होते. रात्री ते सोलापूर - मोहोळ ( Solapur Mohol ) रस्त्यावर आलेले असताना कोंडीजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टरच्या पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकचा टायर फुटला आणि वेगात असलेला हा ट्रक (एम एच १२ टी व्ही ७३४८) सरळ ट्रॅक्टरवर चढला. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रॅक्टरसकट पाचशे ते सहाशे फूट फरफटत नेले आणि रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोंडीजवळ एकच आकांत सुरु झाला. वारकऱ्यांची दिंडीच एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघाली होती.


सोलापूर विद्यापीठासमोर असलेल्या पुलाच्या उतरणीला हा भीषण अपघात झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी परिसरातून एक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून सुमारे ५० ते ६० भाविक पंढरपूर एकादशीसाठी निघालेले होते. ट्रकने फरफटल्याने पुलाचे कठडे तोडून ट्रॅक्टर ट्रॉली पालथी झाली आणि यात चार भाविक जागीच ठार झाले तथापि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात होताच रात्रीच्या अंधारात मोठा आवाज काळोखाला भेदत गेला आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उचलून नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला आणले आणि नंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


भीषण अपघात होताच ट्रकचा चालक आणि त्याचा सहकारी तेथून अंधाराचा फायदा घेत पळून गेले आहेत. या भीषण आणि थरारक अपघातात जरसन मिसाळ ( वय ६० ), भागाबाई मिसाळ ( वय ६० ), तुकाराम सुदाम शिंदे ( वय २० ), ज्ञानेश्वर दत्ता साळुंखे ( वय १६ ) हे जागीच ठार झाले आहेत. मृतांचा आकडा ८ ते १० वर असल्याचेही सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अन्य वरिष्ठ अधिकारी हे देखील घटनास्थळी तातडीने दाखल झाले. 


अपघात झाल्याने सोलापूर- पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नंतर काही वेळाने ही वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरु झाली . जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असून अपघाताचे दृश्य अत्यंत थरारक आणि काळीज गोठवणारे होते. एकादशीच्या निमित्ताने पंढरीला निघालेल्या भाविकांना अर्ध्या रस्त्यावरच काळाने गाठले. ( Terrible accident of devotees going for Pandharpur Vitthal Darshan ) हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉलीचे दोन तुकडे झाले मृत आणि जखमी तसेच त्यांचे साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. अपघात होताच चार जणांचा मृत्यू झाला आहे तथापि काही जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला चार जणांचा मृत्यू समोर आला परंतु नंतर हा आकडा वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे देखील वाचा :

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !