BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२२

ट्रकची जोरदार धडक, पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू !



बुलढाणा : आजची एकादशी ही भाविकांसाठी अत्यंत संकटाची ठरली असून भाविकांच्या गाडीला दुसरा अपघात होऊन या अपघातात देखील पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. 


एकादशीचा दिवस भाविकांसाठी अत्यंत पवित्र असतो आणि मोठ्या श्रद्धेने, भक्तीने भाविक देवाच्या दर्शनासाठी जात असतात. देवदर्शनाला जाणाऱ्या अनेक भाविकाचे प्राण वेगवेगळ्या अपघातात जाताना दिसत आहेत. पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकरी, भाविकांना चिरडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. एरवी देखील भाविक खाजगी गाडी घेवून देवदर्शनाला जात असतात तेंव्हाही मोठे अपघात झालेले आहेत. आज एकादशी असल्याने भाविक तीर्थक्षेत्री जातात आणि देवाचे दर्शन घेवून समाधान मानतात. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी परिसरातील दिंडी एका ट्रॅक्टरमधून पंढरीकडे निघाली असताना एका ट्रकने उडविले आणि सोलापूरजवळ पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 


पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला आणि याचे राज्यभर दुःख व्यक्त होत असताना बुलढाणा , देऊळगाव राजा येथे देखील अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनालाही मोठा अपघात होऊन पाच भाविक ठार झाले आहेत. Accident of devotees going for darshan, five dead ) सदर भाविक जालना जिल्हयातील रोहनवाडी येथील भाविक संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे निघाले होते. शेगाव येथे पोहोचण्यापूर्वीच एका ट्रकने जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. यात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर सात भाविक जखमी झाले आहेत. 


रोहनवाडी येथील भाविक बोलेरो गाडीने (क्रमांक एम एच २८ वही ४४२१) शेगावकडे दर्शनासाठी निघाले होते. देऊळगाव राजा शहराच्या लगत शहराच्या बाहेरील रस्त्यावरील वळणावर हा अपघात झाला.  समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या मालवाहू ट्रक (एम एच १६ क्यू १६८२) सरळ भाविकांच्या बोलेरो गाडीवर येऊन आदळली. समोरून ट्रकने जोरदार धडक दिल्याने गाडीतील पाच भाविक जागीच ठार झाले तर सात भाविक जबर जखमी झाले आहेत. आजच्या दिवसातील हा दुसरा मोठा अपघात असून दोन्ही अपघातात भाविकांचेच प्राण गेले असल्याने आजची एकादशी भाविकांचा काळ होऊन आली असल्याचेच समोर आले आहे.   


रात्री पहिला अपघात !

आज आमलकी एकादशी असल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविक पंढरीकडे (Pandharapur) निघालेल्या भाविकांच्या वाहनाला कोंडीजवळ अपघात झाला होता. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून पंढरपूरकडे निघालेले होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते सोलापूर - मोहोळ ( Solapur Mohol ) रस्त्यावर आलेले असताना कोंडीजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टरच्या पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकचा टायर फुटला आणि वेगात असलेला हा ट्रक (एम एच १२ टी व्ही ७३४८) सरळ ट्रॅक्टरवर चढला. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रॅक्टरसकट पाचशे ते सहाशे फूट फरफटत नेले.  


सोलापूर विद्यापीठासमोर असलेल्या पुलाच्या उतरणीला हा भीषण अपघात झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी परिसरातून एक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून सुमारे ५० ते ६० भाविक पंढरपूर एकादशीसाठी निघालेले होते. ट्रकने फरफटल्याने पुलाचे कठडे तोडून ट्रॅक्टर ट्रॉली पालथी झाली. अपघाताचे दृश्य अत्यंत थरारक आणि काळीज गोठवणारे होते. एकादशीच्या निमित्ताने पंढरीला निघालेल्या भाविकांना अर्ध्या रस्त्यावरच काळाने गाठले.  हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉलीचे दोन तुकडे झाले मृत आणि जखमी तसेच त्यांचे साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. 


 हे देखील वाचा : >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !