BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२२

सोलापुरात चिमुकलीसाठी नानांनी दिले आपले हेलिकॉप्टर !



सोलापूर : राजकीय नेत्यांचे अनेकदा वाईट अनुभव येत असले तरी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले हेलिकॉप्टर चार वर्षाच्या चिमुकलीला देऊन माणुसकी दाखविल्याने (Salute to Nana Patole's humanity) त्यांच्या  दिलदारीला सोलापूर जिल्ह्याने सलाम केला आहे. 


अलीकडील काळात राजकारणाची पातळी खालावली असल्याचे रोज अनुभवाला येत आहे. केवळ स्वार्थ आणि अहंकार जपणारी असंख्य माणसं राजकरणात दिसतात तर काही जण केवळ दिखावा करण्यापुरती माणुसकी दाखविल्याचा आभास निर्माण करतात असे देखील अनुभव येत असतात. निवडणुकीत उमेदवारी मिळाली की नेते सामान्य आणि गरीब माणसासाठी काही केल्याचे जरूर दाखवतात पण निवडणुकीनंतर दिसणारे चित्र आणि येणारे अनुभव हे धक्कादायक असतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एरवी बोलताना अनेकदा वाद निर्माण होणारी वक्तव्ये करतात पण त्यांनी सोलापुरात दाखविलेल्या दिलदारीला तोड नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. 


सोलापुरातील एका चार वर्षाच्या चिमुकलीसाठी आपले हेलीकॉप्टर देऊन स्वतः मात्र रेल्वेने जाण्याचा निर्णय नाना पटोले यांनी घेतला आणि राजकारणात देखील माणुसकी जपणारी माणसं (Philosophy of humanity in politics) असल्याचे महाराष्ट्राला केवळ पाहायला नव्हे तर अनुभवायलाही मिळाले. नानांच्या या दिलादारीला मानवतेने देखील सलाम केला आहे. सोलापूर येथील तुकाराम दासी यांची ४ वर्षे वयाची चिमुकली उंजल तुकाराम दासी या मुलीला हृदयविकाराचा त्रास होता आणि  तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत लवकर मुंबईला पोहोचण्याची आवश्यकता होती. (Nana Patole gave her own helicopter for little girl)

 


चार वर्षाच्या चिमुकलीसाठी तिच्या वडिलांचा जीव टांगणीला लागलेला होता. सोलापुरातून मुंबईला वेळेत पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्य होते. प्रचंड काळजीत असलेल्या तुकाराम दासी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे धाव घेतली आणि आपल्यावर असलेल्या संकटाची माहिती त्यांनी आ. शिंदे यांना दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोलापूर दौरा असल्याने आ. शिंदे या देखील व्यस्त होत्या पण त्यांनी सामान्य माणसांच्या अडचणीसाठी वेळ काढला आणि दासी यांची अडचण जाणून घेतली. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दासी यांच्या चार वर्षीय मुलीची अवस्था सांगितली. क्षणाचाही विलंब न लावता नाना पटोले यांनी आपले हेलिकॉप्टर या मुलींसाठी देऊ केले आणि आपण रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. 


काही वेळेतच ऊंजल दासी या चिमुकलीला घेऊन नानांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले. चार वर्षाच्या मुलीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत तर झालीच पण नानांच्या या दिलदारीचे प्रत्येकाने मनापासून कौतुक करून नानांना धन्यवाद देण्यात आले. मानवता हरवत चाललेल्या आजच्या दुनियेत एवढी मोठी माणुसकी दिसत नाही पण राजकारणात असलेल्या नाना पटोले यांनी मात्र मोठा दिलदारपणा दाखवला आणि त्यांच्या या दिलदारीला मानवतेने देखील सलाम (Salute to Nana Patole) केला. 

हे देखील वाचा : >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !