BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२२

किसान योजनेसाठी आता नियमात मोठा बदल !

 



मुंबई : किसान सन्मान योजनेत केंद्र शासनाने मोठा बदल केला असून या बदलानुसार कागदपत्रांची पूर्तता न केल्यास या योजनेतून एक रुपयाही कुणाच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान अटळ आहे. 


शासनाने शेतकरी बांधवाच्या सन्मानासाठी किसान सन्मान योजना सुरु केली परंतु यात झारीतील शुक्राचार्य घुसले असल्याचे निदर्शनास आले. पात्र नसलेले लोक या योजनेचा फायदा घेऊ लागले आहेत. या योजनेत घोटाळेबाज मंडळीना आवर घालण्यासाठी शासनाने आता नियमातच बदल केला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी तातडीने संबंधित एजन्सीकडे नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज आहे.  रेशनकार्डची पूर्तता न झाल्यास या योजनेतून एक रुपयाही दिला जाणार नाही. त्यामुळे वार्षिक सहा हजार रुपयांचा हप्ता देखील मिळणार नाही.  एकदा रेशनकार्ड नंबर मिळाल्यानंतर त्या कुटुंबातील एकाला किसान सन्मान निधी मिउळू शकेल. रेशन कार्ड सादर न केल्यास मात्र पुढचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

  

किसान योजनेंतर्गत नोंदणीवर रेशन कार्डाचा क्रमांक द्यावा लागणार असून त्यासोबत रेशन कार्डाची पीडीएफ फाईल अपलोड करावी लावणार आहे. त्यामुळे आता या कागदपात्रांच्या सत्य प्रती देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. या योजनेशी संबंधित कागदपत्रांच्याही सत्यप्रतींची आता गरज उरणार नाही, त्याच्या पीडीएफ फाईल तयार करून त्या अपलोड करणे मात्र आवश्यक आहे.. या योजनेत होत असलेल्या फसवणुकीला आला घालण्यासाठी हा उपाय करण्यात आला असून नोंदणी करणे देखील यामुळे सोपे होणार आहे.   


वाचा : पंढरपूर तालुक्यात पोष्टात रकमेचा अपहार !

पंढरपूर - सांगोला मार्गावर पुन्हा अपघात !

'यांना' नाही आता मास्क लावण्याची गरज !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !