नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लहान मुलांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून पाच वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांसाठी मास्क आता अनिवार्य नसल्याचे सांगितले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालापासून सर्वांसाठी मास्क वापरणे बंधनकारक केले होते तसेच अनेक नियम आणि निर्बंध लागू केले होते पण केंद्र सरकारने त्यात काही बदल केले असून त्याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने लहान आणि किशोरवयीन म्हणजे १८ वर्षाखालील मुलांसाठी सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यानुसार पाच किंवा पाच पेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क वापरण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. सहा ते अकरा वर्षे वयाची मुले पालकांच्या देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीने मास्काचा वापर करू शकतात असेही सांगण्यात आले आहे.
बारा वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मात्र मास्क आवश्यक करण्यात आला असून त्यांनी मोठ्या व्यक्तीसारखेच मास्कचा वापर करावा. ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या गटाद्वारे मार्गदर्शक तत्वाचे पुनवलोकन करण्यात आले असून ओमीक्रॉन हा कमी गंभीर आहे असे इतर देशांच्या आकडेवारीवरून दिसते. तथापि मोठ्या साथीच्या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे असेही म्हटले गेले आहे. अठरा वर्षाच्या मुलांसाठी अँटिव्हायरल अथवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची मात्र शिफारस करण्यात आलेली नाही. स्टिरॉइड्स वापरल्या गेल्या असतील तर दहा ते १४ दिवसात क्लिनिकल सुधारणेच्या आधाराने त्याचे डोस कमी करीत जाणे आवश्यक आहे असे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
ठळक मार्गदर्शक सूचना
पाच किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क अनिवार्य नाही, बारा वर्षे ज्जीनवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांनी प्रौढ व्यक्तींच्या प्रमाणे मास्कचा वापर करावा, अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनां मोनोक्लोनरल अँटीबॉडीजचा सल्ला देण्यात येत नाही, कोरोनाच्या माईल्ड प्रकरणात स्टिरॉइडचा वापर करणे घटक आहे, कोरोनासाठी स्टेरॉईड वापरणे योग्य वेळी आवश्यक असून डोस देखील योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे. योग्य असेल तर लस देखील दिली पाहिजे. ज्यावेळी लहान मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल त्यानंतर त्या कुटुंबाचे काउन्सिलिंग केले पाहिजे आणि ऱ्यांना लहान मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे तसेच श्वसनासंबंधी देखील त्या कुटुंबाला माहिती दिली गेली पाहिजे, कोरोनाचा उपचार सुरु असताना मुलाच्या शरीराच्या कोणत्याखी भागात काहीही समस्या निर्माण झाल्याचे दिसल्यास त्यावर योग्य उपचार देणे गरजेचे आहेत अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !