BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑग, २०२२

विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, दोन ठार तर वीस जखमी !

 


शोध न्यूज : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसला मोठा अपघात होऊन दोन ठार तर वीस जण जखमी झाले आहेत, एकूण ७० जण या बसमधून प्रवास करीत होते. 


महाविद्यालयाच्या बसमधून विद्यार्थी रोज महाविद्यालयात जात असतात आणि त्याच बसमधून परत येत असतात. विद्यार्थ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसबाबत विशेष दक्षता घेण्यात येत असते आणि बसच्या चालकावर देखील संबंधित संस्था लक्ष ठेवून असते. असे असले तरी अथणी येथे महाविद्यालयीन बस आणि टेंपो यांच्यात भीषण अपघात झाला आणि या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या बसचा चालक रघुनाथ अवताडे (वय ४०) आणि टेंपोचा चालक मलिकसाहेब मुजावर (वय २३) अशी या मृतांची नवे असून बस मधील वीस विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत . यातील पाच विद्यार्थिनी गंभीर स्वरूपाच्या जखमी असून त्यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 


आज मिरज - विजापूर रस्त्यावर अपघाताची ही भीषण घटना घडली असून यावेळी रस्त्यावर प्रचंड आरडाओरडा आणि गोंधळ सुरु झाला.  अथणी गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या बनजवाड हायस्कूल आणि महाविद्यालय येथे विद्यार्थिनीना घेवून ही बस निघालेली होती. यावेळी मिरजकडून अथणीकडे एक आयशर टेंपो प्लास्टिक पाईप घेवून निघाला होता. या टेंपोने विद्यार्थिनीच्या बसला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. बसमधून एकूण ७०  विद्यार्थिनी प्रवास करीत होत्या. या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरच्या भागचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  


सत्तर पैकी वीस विद्यार्थिनी जखमी झाल्या असून पाच विद्यार्थिनीना या अपघातात अधिक मार लागला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर अपघात होताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली, विद्यार्थिनींच्या पालकांना अपघाताची माहिती मिळाली तेंव्हा महाविद्यालयीन प्रशासन देखील तातडीने घटनास्थळी धावले. (Students bus accident, two killed and twenty injured) मुलींच्या पालकांना ही माहिती मिळाली तेंव्हा त्यांना धक्का बसला असून पालक अथणीच्या दिशेने रवाना होऊ लागले. सर्वच मुलींचे पालक आपल्या मुलीची प्रकृती जाणून गेताना दिसले.


विद्यार्थिनींचा आक्रोश !

अपघात होताच बसमधील विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या होत्या आणि त्यांनी आक्रोश सुरु केला. चालकाच्या शेजारी काही विद्यार्थिनी बसलेल्या होत्या आणि त्या जखमी झाल्याचे पाहून इतर विद्यार्थिनी अधिकच घाबरून गेल्या आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरु झाला. बस मधील सर्व विद्यार्थिनी या परगावच्या असून त्या अथणी येथील वसतिगृहात राहतात. त्यांना वसतिगृहातून महाविद्यालयात घेवून जात असताना हा अपघात झाला. 


नागरिक धावले !

अपघात होताच आजूबाजूला असलेले नागरिक धावून गेले आणि त्यांनी अपघातातील जखमी तसेच इतर विद्यार्थिनीना मदत केली. बसमधून त्यांना बाहेर काढले आणि जखमी झालेल्या विद्यार्थिनींना रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीची बराच वेळ कोंडी झाली होती. पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !