BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२३

साहेब, निर्णय बदला ! ! सोलापूर जिल्ह्यातून रक्ताने लिहिले पत्र !



शोध न्यूज : साहेब, निर्णय बदला ! अशी मागणी करीत सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने पत्र लिहून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. राज्यभरातून केवळ राष्ट्रवादी पक्षातच नव्हे, तर सर्वसामान्य माणसात देखील काळापासून मोठी अस्वस्थता आहे.


गेल्या काही दिवसापासून राजकारणात रोज नव्या घडामोडी आणि उलथापालथ होत आहे. गेल्या ९ महिन्यानापासून ठाकरे आणि शिंदे संघर्ष गाजत आणि वाजत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातून मोठी सहानुभूती मिळत आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी मजबूत होत आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकालाने यावर शिक्कामोर्तब केलेही आहे. लोक आता निवडणुकीची वाट पहात असतानाच, राष्ट्रवादीत वेगळीच कुजबुज सुरु होती. अचानक अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, भाजपात जाण्याची चर्चा जोर धरणे, अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणे अशा काही बाबी वेगळेच संकेत देत राहिले आणि यातच, राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे जनक, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या घोषणेने अनेकांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच नव्हे, सर्वसामान्य जनतेला देखील हा धक्का असून अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे देखील दिले आहेत. 


राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना देखील तीव्र असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील, खिलारवाडी येथील भूषण चंद्रकांत बागल या तरुणाने, आपल्या रक्ताने पत्र लिहून शरद पवार यांना विनंती केली आहे. राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या अशी कळकळीची या तरुणाने पवार यांना केली आहे. भूषण बागल हा युवक खिलारवाडी येथील रहिवाशी असून तो तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. खा. शरद पवार यांना दैवत मानून, भूषण हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे सक्रिय आहे. साहेबांसाठी प्रसंगी जीवही देईन मी एक सुशिक्षित आणि शेतकरी कुटुंबातील युवक आहे. खा. शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या हितासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा यांनी प्रेरित होऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. खा. शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्री म्हणून घेतलेले निर्णय खूप दूरगामी आहेत. देशातील शेतकऱ्यांची नेमकी जाण असलेल्या या नेत्याची देशाला आणि राज्याला नितांत गरज आहे. आज साहेबानी राजीनामा दिला आहे, तो परत घ्यावा म्हणून रक्‍ताने पत्र लिहले आहे. जर साहेबांच्या विचारावर चालत असताना गरज पडलीच तर प्रसंगी साहेबासाठी जीव ही देईन. असे बागल यांनी म्हटले आहे. 


 बागल यांच्याप्रमाणे राज्यातील असंख्य कार्यकर्ते अस्वस्थ असून, शरद पवार यांच्या या निर्णयाने त्यांना जोरदार धक्का बसला आहे. पुण्यातील 'साहेब प्रतिष्ठान' तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, संदीप काळे याने आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झालो आहे, आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. शरद पवार यांनी, कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन, निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी दोन तीन दिवसांची मुदत मागितली आहे. यानंतर कार्यकर्ते काहीसे शांत झाले आहेत. 


शरद पवार यांच्या अंतिम निर्णयाची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा लागलेली असून, राजकारणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. शरद पवार आपला निर्णय बदलतील काय ? (A letter written in blood to Sharad Pawar from Solapur district) याबाबत सगळ्यांनाच प्रतीक्षा असून, तसे नाही घडले तर मात्र राष्ट्रवादीत बऱ्याच काही घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याचीही चर्चा सुरु झाली आहे. तरुण कार्यकर्ते हे शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करीत आहेत तर अनेक जुने कार्यकर्ते, शरद पवार यांच्या वयाचाही विचार करावा असे सांगू लागले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नक्की काय घडतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  


बारामतीत अस्वस्थता !

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने राज्यभरात खळबळ उडाली असून बारामती येथे देखील प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळाली आहे.  असे अचानक पवार साहेब निवृत्तीचा निर्णय कसे घेतील ? असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे. यावरच बारामती परिसरात चर्चा सुरु आहे. अनेकजण आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. दरम्यान, देशातील शेतकरी, उद्योगपती, कामगारांसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला त्यांची गरज आहे. जनतेचा आवाज ऐकून ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील, अशीह अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !