चाकूर : आपलाच फोटो व्हॉटस ऍप ग्रुपवर टाकून स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत जिल्हा परिषदेतील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहेच पण या आत्महत्या करण्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आल्याने आत्महत्या करण्यासाठी देखील या मीडियाचा वापर होत असल्याचे दिसत आहे. कुणी फेसबुक लाईव्ह करीत आत्महत्या करीत आहे तर कुणी आपल्या आत्महत्येबाबत आधी मेसेज पाठवून आत्महत्या करीत आहे. कुणी मोबाईलवर चित्रीकरण करीत गळफास घेत आहेत. चाकूर येथील शिक्षकाने असाच पण काहीसा वेगळा प्रकार करीत आपल्या जीवनाचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक असलेल्या ४० वर्षे वयाच्या सचिन शिवराज अंबुलगे या शिक्षकाने अशा प्रकारे आपल्याच फोटोला श्रद्धांजली अर्पण करीत आत्महत्या केली आहे.
शिक्षक अंबुलगे एका भाड्याच्या खोलीत आपल्या कुटुंबियांसह राहत होते, त्यांची पत्नी आणि मुलगा गावी गेल्याची संधी साधून त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांच्या व्हाट्स ऍप ग्रुपवरून आपला फोटो टाकत स्वतःलाच 'भावपूर्ण श्रद्धांजली' वाहिली. आपल्या नातेवाईकांना त्यांनी आपण आत्महत्या करीत असल्याबाबत माहिती दिली. रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडल्याने कुणाच्या लक्षात आले नाही पण सकाळी जेंव्हा हा संदेश पहिला तेंव्हा अनेकांना धक्का बसला. सकाळी नातेवाईक धावले पण दरवाजा आतून बंद होता आणि तो उघडला जात नव्हता यावरून सगळे काही घडून गेल्याची जाणीव नातेवाईकांना झाली. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता साडीच्या साहाय्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या गाडली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. यावेळी सदर शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली एक चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. एक खाजगी सावकार आपल्या पतीला त्रास देत असल्याबाबत त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वीच पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे आता पोलीस त्या दिशेने तपास करू लागले आहेत.
वाचा : पंढरपूर तालुक्यात पोष्टात रकमेचा अपहार !
- पंढरपूर - सांगोला मार्गावर पुन्हा अपघात !
- 'यांना' नाही आता मास्क लावण्याची गरज !
- -- किसान सन्मान योजना नियमात मोठा बदल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !