BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

पोलीस अधिकारी होता आले नाही, तरुणाची दुर्दैवी आत्महत्या !


पुणे : एमपीएससीचा अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी होण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या सांगलीच्या ३३ वर्षे वयाच्या एका तरुणाने आत्महत्या केल्याने अवघा महाराष्ट्र तळमळला. सांगलीच्या अमर मोहिते या तरुणाने विषारी औषध प्राशन करून ध्यायापुर्तीपूर्वीच आपल्या आयुष्याचा शेवट केला.  


अमर मोहिते हा तरुण राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होता. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडल्याने तो प्रचंड नैराश्यात होता अशी माहिती त्यांच्या काही मित्रांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील अमर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला होता आणि येथे तो एका वसतिगृहात राहत होता. त्याने सदाशिव पेठेतील वसतिगृहात विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडल्यापासून तो निराशेत होता. कोरोनाच्या कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलल्या गेल्या आणि त्याच्या नैराश्यात भर पडली. आणि अखेर त्याने नको ते टोकाचे पाउल उचलले. 


अमरच्या जाण्याने त्याच्या परीवारावर मोठा आघात तर झालाच आहे पण त्याच्या मित्रांना फार मोठा धक्का बसला आहे. या आधी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते.आज पुन्हा एका विद्यार्थ्याची अशी आत्महत्या समोर आली आहे.  


वाचा : कोरोना लसीमुळे लहान मुलीचा मृत्यू !

  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !