मुंबई : मुंबईच्या पंधरा वर्षे वयाच्या एका मुलीचा कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप करून एका डॉक्टरांनीच खळबळ उडवून दिली आहे. मृत्यू झालेल्या मुलीचे छायाचित्रही या डॉक्टरानी ट्विट केले आहे.
हे देखील वाचा : एका दिवसात एकट्याने तोडला सोळा टन ऊस !
कोरोना लस आल्यापासून अनेकांनी अनेक प्रकारचे गैरसमज झाले आणि काहींनी कसलाही पुरावा नसताना लसीबाबत मोठमोठी विधानही केली आहेत. शासन आणि प्रशासन लसीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे, तिसरी लाट आली असून तिचा सामना करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे तज्ञ सांगत आहेत. आजही गैरसमज आणि भीतीपोटी असंख्य नागरिकांनी लस घेतलेली नाही. कोरोनाची तिसरी लाट आल्याने शासन सतर्क असताना आणि लसीकरणाचे आवाहन केले जात असताना एक एमबीबीएस डॉक्टरांनीच अशा प्रकारचे विधान केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून या लाटेत लहान मुलांनाच अधिक धोका असल्याचे सांगितले गेले आहे. शासनाने ३ जानेवारीपासून पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना लस देणे सुरु केले असून नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यात कुठेही काही अनुचित घटना ऐकायला मिळालेली नाही. लसीबाबत अनेक अफवा पसरविण्यात आल्या आहेत आणि अनेकानी गैरसमज देखील करून घेतले आहेत पण अफवा पसरविणारे कोण आहेत याकडे पाहून त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नव्हता परंतु आता थेट एका डॉक्टरांनीच हा आरोपी किंवा खळबळजनक दावा केला आहे.. डॉक्टरांनी हे ट्विट केल्याचे समोर आल्याने चर्चा तर होणारच !
एम बी बी एस असलेले डॉक्टर तरुण कोठारी यांनी ट्विटरवरून हा धक्कादायक आरोप केला आहे. एका डॉक्टरांनी हा आरोप केल्याने तो सहजपणे दुर्लक्षित करता येणार नाही परंतु लसीबाबत भीती अथवा गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून शासनाने तातडीने यातील सत्य जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे. या डॉक्टरांनी १८ वर्षाखालील मुलांच्या ट्रायल व्हॅक्सिनेशनमध्ये घाटकोपर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीच्या मृत्यूला कारणीभूत टाळ्यांचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रायल लसीकरणामुळे १५ वर्षीय आर्यबेन गोविंदजीभाई या मुलाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. सदर मुलीचा फोटो ट्विट तर त्यांनी केलाच आहे पण 'ट्रायल लस घेऊन मृत्यूचे शिकार बनू नका' असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एका डॉक्टरने हा दावा केल्याने त्याला काहीसे महत्व नक्कीच प्राप्त होत आहे पण जबाबदार असलेल्या डॉक्टरांनी केवळ अशा प्रकारे ट्विटरवर आरोप करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा थेट समोर यायला हवे होते तसेच त्याची योग्य पडताळणी करून हा विषय सार्वजनिक व्हायला हवा होता. आधीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आणि अफवा पसरत आहेत त्यात यामुळे भर पडणार आहे. एक डॉक्टर सांगतात त्यामुळे लोक यावर विश्वास देखील ठेवणार आहेत. डॉक्टरसारखी सामाजिक भान असणारी व्यक्ती असा आरोप करते याला काही अर्थही असू शकतो. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते विनाविलंब जनतेसमोर येण्याची गरज असून शासनाने तातडीने या आरोपांची पडताळणी करावी अशी सर्वसामान्य व्यक्तीलाही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.
डॉक्टर तरुण कोठारी यांनी ट्विट केल्यानंतर त्यासंदर्भात अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत तर काहींनी या घटनेसंबंधी परराज्यात आलेल्या वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे शेअर केली आहेत. मुलीच्या मृत्यूचा करण्यात आलेला आरोप एवढा सामान्य नाही किंवा तो 'कुणीही' या सदरात मोडणाऱ्या व्यक्तींनी केला नाही त्यामुळे अत्यंत वेगाने या प्रकरणातील सत्य समोर येणे अत्यावश्यक बनले आहे. सदरची घटना ही सत्य आहे की अफवा आहे याचे सत्य समोर यायला हवे अन्यथा लोक लसीकरणापासून दूर जाण्याचा मोठा धोका संभवत आहे. संभ्रम निर्माण होणे हे अधिक धोकादायक आहे. शासन अथवा प्रशासन यांचे स्पष्टीकरण येईपर्यंत यावर विश्वास ठेवणे धोकादायक असणार आहे.
(मुलीच्या मृत्यूबाबत डॉक्टर तिवारी यांनी केलेल्या दाव्याची अथवा आरोपाची आम्ही पुष्टी करीत नाही. डॉक्टरांनी केलेल्या आरोपांची माहिती देणे एवढाच हेतू )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !