BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ जाने, २०२२

मटण आणायला गेला आणि कोट्याधीश होऊनच आला !


केरळ : माणसाच्या नशिबात असलं की सगळं आपोआप चालून येतं म्हणतात असाच काहीसा प्रकार घडला आणि मटण आणायला बाहेर पडलेला सदानंदन बारा कोटींचा मालक होऊनच घरी आल्याची घटना घडली. 


घरात चोरी झाली अथवा काही नुकसान झालं तर माणूस स्वत;चेच समजूत काढतो आणि जवळचं कुणी ओरबाडून नेलं तरी नशिबात असलेलं कोण नेणार आहे ? असं म्हणत असतो. कुणाचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे कुणालाच सांगता येत नाही. नशिबावर भरवसा ठेवणारे असंख्य लोक या जगात आहेत. जीवनात जी घटना घडते अथवा जे काही होतं ते नशिबानेच होतं असं मानणारा मोठा वर्ग आहे. काहीही वाईट घडलं तरी नशिबाला दोष दिला जातो. या नशिबानेच कधी रंकाचा राव होईल आणि रावांचा कधी रंक होईल हे सांगता येत नाही ! केरळचा सदानंद असाच नशिबाने एका दिवसात रंकाचा 'राव' म्हणजे कोट्याधीश बनला आहे. 


केरळमधील कोट्टायम येथे राहणार सदानंदन आयुष्यभर कष्ट करीत राहिला, तब्बल ७२ वर्षे कष्टात घालवली. गेल्या पन्नास वर्षांपासून सदानंदन हा पेंटिंगचे काम करीत असून वय झाले तरी त्याने हे काम सुरूच ठेवले होते. काम केल्याशिवाय त्याचा आणि  त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होणार नव्हता, डोळ्याची नजर कमी झाली तरी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण अचानक सदानंदन याचे नशीब फिरले आणि काही तासात तो कोट्याधीश बनला. 'खुदा देता है तो छप्पर फाडके देता है' असं म्हणतात त्याचा थेट अनुभव त्याने घेतला. त्याला तब्बल बारा कोटींची लॉटरी लागली आणि त्याचे अवघे जग बदलून गेले. अवघ्या काही तासात तो बारा कोटींचा मालक बनला. 


बाजारातून मटण आणण्यासाठी सदानंदन बाजारात गेला आणि जाता जाता त्याने सेल्वन नावाच्या लॉटरी तिकीट विक्रेत्याकडून लॉटरीचे एक तिकीट खरेदी केले. या लॉटरीची मुदत संपण्यासाठी अवघे पाच तास शिल्लक असताना त्याने हे तिकीट (एक्स जी २१८५८२) घेतले आणि नशीब आजमावून पाहायचे ठरवले.  अवघ्या तीनशे रुपयांत खरेदी केलेल्या याच तिकिटाने त्याला कोट्याधीश बनवले. याच तिकिटाने त्याला बारा कोटी रुपयांचा मालक बनवले. मटण आणायचे म्हणून तो घराबाहेर पडला आणि चक्क बारा कोटींचा मालक बनला ! नशिबात असलं की ते कसंही आपल्या पायाने चालून आपल्या घरापर्यंत येतं ते हे असं !


वाचा पंढरपूर तालुक्यात भरदिवसा मोठी चोरी !


 .       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !