BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२२

कुठं आहे कोरोना ? हजारो लोकांची उसळली गर्दी !

 



बीड : प्रत्येकाच्या मनावर कोरोनाचे दडपण असताना 'कोरोना गेला उडत' असं म्हणत इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनासाठी खच्चून गर्दी झाली आणि कोरोना नियमांना अक्षरश: पायदळी तुडविण्याचे काम करण्यात आले आहे. 

कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे शासने नवी नियमावली जारी केली आहे, सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, धार्मिक कार्यक्रम अशा सगळ्याच कार्यक्रमावर निर्बंध आणून कोरोनाला अटकाव करण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन करीत आहे. विवाह आणि अत्यसंस्कार येथेही उपस्थिती संख्येवर मोठ्या मर्यादा आणण्यात आल्या आहेत आणि बीड जिल्ह्यातील नांदूरघाट गावात इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनात वेगळाच 'तमाशा' पाहायला मिळाला आहे, देशातम राज्यात सगळीकडेच कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे तसे बीड जिल्ह्यातही ग्रामीण भागापर्यंत रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. असे असतानाही इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आणि या कीर्तनास हजारो लोक उपस्थित राहिले. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इंदुरीकर महाराज म्हटले की प्रचंड गर्दी होते हे महाराष्ट्राला माहित आहे तरी देखील त्यांच्या कीर्तनाचे आयोजन कोरोनाच्या संकटकाळात करण्यात आले. हजारोंची गर्दी या कार्यक्रमास तर झालीच पण कुठलाच नियम पाळण्यात आला नाही. मास्क न वापरता लोक कीर्तन ऐकत बसले होते तर व्यासपीठावरील राजकीय व्यक्तीनाही मास्कचा विसर पडलेला होता, एकमेकांना खेटून सगळा कार्यक्रम सुरु होता, हे चित्र पहिले की या मंडळीना अजून कोरोनाबाबत काहीच माहिती मिळालेली नाही असे भासत होते. कोरोनाला खुले निमंत्रण देणारेच हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाह्यला मिळत होते. 


मनसेने आयोजित केलेला हा कार्यक्रम नांदूरघाट पोलीस चौकीच्या समोरच्या बाजूलाच असलेल्या बाजार तळावर आयोजित करण्यात आला होता आणि कीर्तनासाठी पाच ते सात हजार लोक जमलेले दिसत होते. एवढी मोठी गर्दी होऊनही पोलीसानीही याकडे दुर्लक्ष केले याचे देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. सगळे घडून गेल्यावर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.   


जरूर वाचालाल ओळीवर क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !