BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२२

पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची गोपनीय माहिती !

 



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून समोर आली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर येवून ठेपला आहे आणि अशा कालावधीत सुरक्षा यांतानांच्या गोपनीय अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत मोठ्या कटाची माहिती मिळाली असून ९ पानांचा हा अहवाल असल्याची माहिती इंडिया टुडे ने सांगितली आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसावर असताना ही मोठी आणि धक्कादायक  माहिती समोर आली आहे.


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आशियाई देशातील मान्यवरांना निमंत्रित करण्याची शक्यता असते. पाकिस्तान आणि अफगाणिस्थान च्या क्षेत्राबाहेरील गटाकडून हा कट रचला जाऊ शकतो अशीही माहिती या अहवालातून समोर आली आह. मोठ्या दादावरील मान्यवरांना लक्ष्य करणे आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हे या गटाचे उद्दिष्ठ असते. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हरकत उल मुजाहिद्दीन, हिज्बुल मुजाहिद्दीन,  रेझिस्टन्स फोर्स अशा दहशतवादी संघटनांचा या कटात सहभाग असल्यानेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. पंजाब आणि अन्य राज्यात ते हल्ल्याची योजना तयार करीत आहेत अशी माहितीही प्राप्त झाली आहे. ही माहिती समोर येताच अधिकची दक्षता घेण्यात येत आहे.

    

वाचा >> >> पंढरपूर - बाभूळगाव रस्त्यावर अपघात, एक ठार !   


पंढरीत महिला अधिकाऱ्यांची चोरली दुचाकी !


पुण्यात गंडा, पंढरीत अटक !


तिसऱ्या लाटेत 'यांच्यासाठी' मृत्यूचा धोका अधिक !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !