BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२२

क्रूरकर्मा बहिणींची फाशी रद्द, आता जन्मठेप !


 

मुंबई : बालकांचे अपहरण करून त्याना निर्दयपणे ठार करणाऱ्या मायलेकींना ठोठावलेली फाशीची शिक्षा आज उच्च न्यायालयाने रद्द केली आणि त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


पंचवीस वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता एवढे भयानक कांड अंजना गावित आणि इतरांनी कोल्हापुरात केले होते. मुख्य आरोपी अंजना गावित हीचा कारागृहातच मृत्यू झाला होता आणि तिच्या दोन मुली सीमा आणि रेणुका यांच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने आणि सवोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रपतींनी देखील त्यांचा दयेचा अर्ज सात वर्षांपूवीच फेटाळून लावला होता. काळजाचा थरकाप उडविणारे हत्याकांड केले असताना आणि त्यांना फाशीपासून वाचविण्याचे सर्व मार्ग बंद झालेले  असताना शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही, पंचवीस वर्षांपासून या गुन्हेगार महिला भोगत आहेत त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


कोल्हापूर येथील अंजना गावित आणि तिच्या मुली सीमा आणि रेणुका यांनी उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा रद्द करावी म्हणून याचिका दाखल केली होती . सर्वोच्च न्यायालयात त्यांची फाशी कायम राहिली होती आणि राष्ट्रपतींनी देखील त्यांचा दयेचा अर्ज नामंजूर केला होता तरीही त्यांना फाशी देण्यात आली नव्हती. याचाच फायदा घेत त्यांनी ही याचिका दाखल केली आणि आज त्यांची फाशीची शिक्षा रद्द होत जन्मठेपेत परिवर्तित झाली. 


१९९० ते १९९६ या दरम्यान अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना दगडावर आपटून मारण्याचे पाप करणारी कोल्हापूर येथील अंजना गावित ही मूळ नाशिक येथील होती. या अंजनाबाईचे प्रेम एका ट्रक ड्रॉयव्हरवर असल्यामुळे त्याचाशी विवाह करून तिने नाशिक सोडले होते.  त्यांना एक मुलगी झाली आणि त्यानंतर या अंजनाबाईला त्याने सोडून दिले. लहान मुलीचे पालन पोषण करण्यासाठी अंजना मिळेल ती कामे करीत होती. या दरम्यान तिचे निवृत्त सैनिकांसोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी लग्न केले.  त्याच्यापासून तिला दुसरी मुलगी झाली पण हे लग्नही अधिक टिकाऊ ठरले नाही. दोन मुली घेऊन तिचे आयुष्य पुन्हा उघड्यावर पडले होते आणि या मुलींचा सांभाळ कसा करायचा याची तिला चिंता लागून राहिली होती. 


मुलींचा सांभाळ करण्यासाठी तिने चोरीचा मार्ग स्वीकारला. लहान मोठ्या चोऱ्या करून ती आपला आणि मुलींचा उदरनिर्वाह चालवायला लागली होती. काही वर्षे अशीच गेली आणि एक मुलगी रेणुका हिचे लग्न झाले. त्यानंतर मात्र त्यांनी पैशासाठी लहान मुलांचे अपहरण करायला सुरुवात केली. लहान मुलांचे अपहरण करायचे आणि आणि त्यांना भीक मागायला लावल्याची हा 'उद्योग' त्यांनी सुरु केला. झोपडपट्टीत , रस्त्यावर लहान मुलांवर लक्ष ठेवून त्यांना पळवून नेण्याचे प्रकार केले आणि ही घटना पचल्याने त्यांचे धाडस वाढत गेले. त्यानंतर पाच वर्षात त्यांनी वेगवेगळ्या ठिकणावरून जवळपास १३ लहान मुलांचे अपहरण केले आणि भीक मागायला विरोध करणाऱ्या ९ बालकांना त्यांनी दगडावर आपटून अत्यंत निर्दयपणे मारून टाकले. तब्बल ९ मुलांना अशा पद्धतीने मारण्यात आले आणि या हत्याकांडात मायलेकीसह रेणुकाचा पतीही सहभागी झाला होता.   


अत्यंत अमानुषपणे त्यांनी ९ बालकांची हत्या केली पण त्याचा कुणाला थांगपत्ता लागला नव्हता. नंतर मात्र पोलिसांना सुगावा लागला आणि अंजनाबाईच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. १९९० पासून १९९६ पर्यंत त्यांनी ४३ मुलांचे अपहरण केले आणि यातील काही मुलांची निर्दयपणे हत्या केली हे उघड झाल्यानंतर या खटल्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात आली होती.  रेणुकाच्या पतीला या खटल्यात माफीचा साक्षीदार बनविण्यात आले त्यामुळे या हत्याकांडातील सगळे पैलू उघडले गेले. त्यांच्या कारनाम्याने वर्तमानपात्रांचे रकाने रोज भरू लागले आणि ते वाचणाऱ्याच्या काळजाचा थरकाप होत गेला. खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने अंजना आणि तिच्या दोन्ही मुलींना फाशीची शिक्षा ठोठावली. 


या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले गेले पण तेथेही ही शिक्षा कायम राहिली. त्यानंतर मात्र मुख्य गुन्हेगार अंजना गावित हीच कारागृहातच मृत्यू झाला. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले पण तेथेही सीमा आणि रेणुका यांची फाशी कायम ठेवली गेली. पुढे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यात आला तो देखील फेटाळला. २०१४ साली राष्टप्रतीनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर सर्व मार्ग बंद झाले होते. प्रशासनाने मात्र फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात विलंब लावला. पुढे सात वर्षे फाशी दिली गेली नाही आणि याच मुद्द्यावर पुन्हा दोघी बहिणी उच्च न्यायालयात गेल्या आणि आज दोघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली.  फाशीऐवजी आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !