मंगळवेढा : येथील उप कारागृहातही कोरोनाने घुसखोरी केली असून आठ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने समोर आले असून मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ८ पोलीस कर्मचारीही कोरोनाबाधित झाले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीच आहे पण तिचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का हा कोरोना देत असतानाच आता मंगळवेढा येथील उप कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आठ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने समोर आले आहे. मंगळवेढा उप कारागृहातील ३९ आरोपींची आज रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात ८ आरोपी कोरोनाबाधित निघाले आहेत त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या या आरोपींशी गार्ड अंमलदार यांचा सतत संपर्क येत असतो त्यामुळे पोलिसांना देखील संसर्ग झाला असण्याबाबत शंका व्यक्त होत आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील आठ कर्मचारी आधीच कोरोना बाधित आहेत आणि आत उप कारागृहातील एकदम आठ कैदी बाधित असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे बाधित झालेल्या आठही कैद्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे समोर येऊ लागले आहे. उप कारागृहातील काही कैदी तीन ते चार वर्षांपासून या कारागृहात असल्याचे समजते. एवढा काळ कैदेत असताना त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देखील अद्याप मिळालेला नसल्याची माहिती प्राप्त होत आहे. ही माहिती सत्य असेल तर निश्चित धक्कादायक आहे. प्रशासन जनतेला लसीकरण करून घेणेबाबत सतत आवाहन करीत असताना त्यांच्या स्वाधीन असलेल्या कैद्यांना अद्याप लस कशी देण्यात आली नाही हे आश्चर्यकारक आहे.
उप कारागृहात असलेल्या कैद्यांसोबत पोलिसांना आपली नोकरी करावी लागते, गार्ड अंमलदार त्यांच्या बंदोबस्तावर असतोच पण त्यांना न्यायालयात घेऊन जाणे, रुग्णालयात घेऊन जाणे अशी कामे पोलिसाना करावी लागतात. या कैद्यांचा नित्याचा संबंध पोलिसांशी असतो त्यामुळे पोलिसांनाही संसर्ग होणे सहज शक्य असून पोलीस कर्मचारीही आता धास्तावले आहेत. राज्यात सगळीकडे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित होत असताना असा प्रकार समोर येणे हे धक्कादायक असून पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तपासणी करून घेणे आवश्यक बनले आहे. कैद्यांचा पोलिसांशी आणि पोलिसांचा जनतेशी नित्याचा संपर्क असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो. सगळ्याच कारागृहातील कैद्यांची आणि पोलिसांची तपासणी करणे आता अत्यावश्यक होऊन बसले आहे.
मंगळवेढा उप कारागृहातील हा प्रकार समोर येताच प्रशासनाने तातडीने हालचाल करून विलगीकरण केले आहे. अन्य सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येऊ लागली आहे.
जरूर वाचा: लाल ओळीवर क्लिक करा !
- तिसऱ्या लाटेत 'यांच्यासाठी' मृत्यूचा धोका अधिक !
- पंतप्रधानांच्या जीवाला धोका !
- ९ बालकांना दगडावर आपटून मारले, फाशी रद्द !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !