नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट लवकर परत जाईल असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केलेला असताना नवा ओमीक्रॉन तयार झाला असून जगात एकाचवेळी दोन लाटा येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाची तिसरी लाट येईल असे दुसरी लाट सुरु असताना सांगितले जात होते पण दुसरी लाट संपत आली तरी तिसरी लाट आलेली नव्हती त्यामुळे दिलासा मिळू लागला असतानाच कोरोनाचा व्हेरियंट ओमीक्रॉन कधी घुसला हे समजलेच नाही आणि त्याची चर्चा सुरु असतानाच तिसरी लाट आली आणि देशात ती प्रचंड वेगाने पसरली आहे. राज्यभर या लाटेचा प्रसार झाला असून खोडोपाडी आणि वाडीवस्तीवर त्याने शिरकाव केलेला आहे. दरम्यान देशातील आणि बाहेरील देशातील काही तज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंत जवळ आल्याचे सांगून मोठा दिलासा दिला आहे. कधी एकदा कोरोनाचा विषय संपुष्टात येतोय याची प्रतीक्षा असताना आता वेगळी आणि नवी धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या लाटांमागून लाटा आणि एकेक नवे व्हेरिएंट शिरकाव करीत आहेत. कोरोना, डेल्टा आणि ओमीक्रॉन अशी वेगवेगळी रूपे समोर आली असताना झोप उडविणारी बातमी येऊन धडकली आहे. ब्रिटन येथे ओमीक्रॉन याच विषाणुतून नवा व्हेरिएंट निर्माण झाला असून तो वेगाने पसरत निघाला आहे. याचा वेग प्रचंड असल्याचे ब्रिटन आरोग्य संस्थेने सांगितले आहे. नव्याने तयार झालेला हा विषाणू युरोपमधील देशाबरोबर चाळीस देशात पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून यामुळे जगात एकाचवेळी दोन लाटा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा नवा विषाणू डेन्मार्कमध्ये अत्यंत वेगाने पसरू लागला आहे.
बी ए- १ हा ओमीक्रॉनचा मूळ प्रकार असून आता बी ए- २ हा व्हेरिएंट आढळून आला आहे. देशात ओमीक्रॉन बी ए- १ चे रुग्ण सर्वाधिक आहेत. बी ए- २ हा नवा व्हेरिएंट आत्तापर्यंत चाळीस देशात आढळून आला असून त्यापैकी काही नमुने भारत, डेन्मार्क. युके. स्वीडन, सिंगापूर येथे आढळून आले आहेत. बी ए - २ हा व्हेरिएंट देशांत आढळला असला तरी बी ए - १ ची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. बी ए १ ची बाधा झालेल्या रुग्णांना बी ए २ ची बाधा होण्याची शक्यता असल्याचे स्टेनन सीरम इन्स्टिट्यूटचे संशोधक अँडर्स फॉम्सगार्ड यांनी व्यक्त केली आहे. ओमीक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्या व्हेरियंटची बाधा होऊ शकते आणि असे जर झाले तर दोन लाटा एकाचवेळी येऊ शकतात अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
या नव्या व्हेरिएंटला ओळखणे कठीण होत असून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णात ओमीक्रॉनविषयी दोन्ही व्हेरिएंटमध्ये फरक आढळला नाही असे डॉक्टरांचे मत आहे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत नाही परंतु अनेक तज्ञांच्या मतानुसार आर टी - पी सी आर चाचणी बी ए - २ चा नमुना पॉझिटिव्ह दाखविण्यात यशस्वी ठरली आहे परंतु या प्रकाराविषयी अनेक बाबी स्पष्ट होणे बाकी आहे. या नव्या व्हेरिएंटच्या माहितीमुळे जगातील अनेक देशांची झोप आत्ताच उडालेली आहे.
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट प्रचंड विनाश करून गेली आणि आता कुठे मोकळा श्वास मिळणार असे वाटत असताना चोरपावलाने परंतु वायुवेगाने तिसरी लाट आली आणि तिने आपला प्रताप दाखवायला सुरुवात देखील केली आहे. ही लाट अजून उंच जाणार असल्याचे सांगितले जात असताना आता नवा व्हेरीएंट जन्माला आल्याची बातमी प्रत्येकासाठी धक्कादायक असून आधीच्या दोन लाटांनी पुरते उध्वस्त केले असताना आता एकाचवेळी दोन लाटा येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे भविष्यात नक्की काय काय संकटे येणार आहेत याचा आता अंदाज बांधणेही कठीण होऊ लागले आहे.
त्याने तयार केली अशी सायकल की बसले की धावते !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !