BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

सरपंचावर गोळीबार ! खोटा आरोप का केला म्हणत झाडली गोळी !

 



माढा : चोरीच्या आरोपाबाबत जाब विचारात एकाने माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील सरपंच संदीप पाठील यांच्यावर गोळी झाडून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

सदर घटनेबाबत माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद बारबोले यांनी हा गोळीबार केला आहे. सरपंच संदीप पाटील हे आपल्या घरासमोर उभे असता शिंदेवाडी येथील सुवर्णा जाधव, कौशल्या जाधव  प्रमोद जाधव, विनोद जाधव आणि दारफळ  येथील आनंद बारबोले, तनुजा बारबोले हे तेथे आले आणि त्यांनी संदीप पाटील यांना जाब विचारायला सुरुवात केली. 'तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरल्याचा खोटा आरोप का केला ?' असे विचारत शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. 


हा प्रकार पाहून  संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील आणि समाधान पाटील हे मध्ये आले आणि त्यांनी शिवीगाळ कशाला करता ? असे विचारले. यावेळी महिलांनी हाताने आणि लाथा बुक्क्यांनी आणि प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारण्यास सुरुवात केली. जोराचे भांडण सुरु झाल्याने संदीप पाटील ते सोडविण्यासाठी मध्ये पडले. संदीप पाटील मध्ये आल्याचे पाहताच विनोद जाधव हा संदीप पाटील यांच्या अंगावर धाऊन गेला. तेवढ्यात आनंद बारबोले याने त्याच्याजवळचे पिस्तुल काढले आणि संदीप पाटील यांच्या दिशेने रोखले. त्यानंतर तुला खल्लास करतो म्हणत थेट गोळी झाडली. या गोळीबारातून सुदैवाने पाटील बचावले.


सदर प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुवर्णा जाधव, कौशल्या जाधव  प्रमोद जाधव, विनोद जाधव, आनंद बारबोले, तनुजा बारबोले  या सर्वाना अटक करण्यात आली आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यी घटनास्थळी भेट दिली. खेड्यापाड्यात देखील गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत असून संपूर्ण माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.


पिस्तुल झाले लॉक !

पिस्तुल रोखले आणि गोळीही झाडली पण पिस्तुल लॉक झाल्याने गोळी सुटलीच नाही आणि मोठा अनर्थ टळला ! ऐनवेळी पिस्तुल न चालल्याने पाटील यांचा प्राण वाचला ! 


खालील बातम्याही जरूर वाचा : 

त्यासाठी खालील लाईनवर क्लिक करा !


   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !