BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ मे, २०२२

पंढरपुरात वाळू चोरांच्या नऊ बोटी जाळल्या !

 


पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करावर महसूल विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून वाळू उपसा करणाऱ्या ९ बोटी प्रशासनाने जाळून टाकल्या आहेत.


पंढरपूर तालुक्यात आणि भीमा नदीच्या परिसरात वाळू चोरांचे प्रस्थ कायमचेच आहे. एकीकडे प्रशासन करावाया करीत आहे आणि दुसरीकडे सर्रास वाळू चोरी होत आहे. आजवर अनेकदा पोलीस आणि महसूल प्रशासनाने वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे पण वाळू चोरी थांबताना दिसत नाही. प्रशासनाने वाळू उपसा करणारी यंत्रणा अनेकदा उध्वस्त केली आहे तरी देखील वाळू तस्कर लगेच दुसरी यंत्रणा उभारून वाळूची चोरी करते आणि शासनाच्या महसुलाला बुक्का लावला जातो. वाळू चोरीतून गुन्हेगारी फैलावण्यास देखील मदत होत असते. वाळू चोरीच्या या साखळीत मोठी यंत्रणा देखील कार्यरत असते. वाहने, मशिनरी, बोटी आणि मनुष्यबळ अशा सगळ्याच बाबींचा यात समावेश असतो. वेळोवेळी कारवाई केली जात असताना देखील वाळूची तस्करी का थांबत नाही हा प्रश्न देखील सामान्यांना अलीकडे पडत नाही कारण 'ये पब्लिक है, सब जानती है'.


पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांचा धसका वाळू चोरांनी घेतलेला असतानाच रात्री महसूल विभागाने भीमा नदीच्या पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या ९ बोटीना आग लावली आणि जाळून त्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तहसीलदार बेल्हेकर यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी पथकाची नियुक्ती केली असून या पथकाने आत्तापर्यंत अनेकदा छापे टाकून वाळू चोरांना मोठा दणका दिलेला आहे. वाळू उपसा करणाऱ्या बोटी तोडून टाकलेल्या आहेत. वाळू व्यवसायात असलेल्या राजकीय व्यक्तींना देखील याची मोठी झळ बसलेली आहे. काल रात्री पुन्हा या पथकाने जोरदार कारवाई करीत वाळू चोरांना दणका दिला आहे. (Nine boats of sand thieves burnt in Pandharpur) सतत अशा कारवाया झाल्या तर वाळू तस्कर काही प्रमाणात तरी नियंत्रणात येतील अशी आशा आहे. 


'येथे' कारवाई आवश्यक !

नदीपात्रातून वाळू चोरी करून ती कुठल्या न कुठल्या बांधकामासाठी पुरवली जाते. शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी बांधकाम सुरु असते आणि तेथे वाळूचे ढीग पडलेले दिसत असतात. महसूल पथकाने थेट बांधकाम मालकाकडे चौकशी केल्यास विनासायास हे वाळू विक्रेते निष्पन्न होतील परंतु तसे केले जात नाही. वाळू उपसा करण्याची ठिकाणी जशी कारवाई अपेक्षित आहे तसेच अशा बांधकामावर चौकशी होणे देखील तितकेच आवश्यक आहे. 


मोठी पिळवणूक 

सामान्य माणूस कशीबशी आर्थिक जुळवाजुळव करून घर बांधण्याचा प्रयत्न करीत असतो पण वाळू उपलब्ध होत नाही त्यामुळे चोरट्या वाळूची त्याला खरेदी करावी लागते आणि ही वाळू प्रचंड महाग देखील मिळते. बांधकाम मालकाचा काहीही दोष नसतो तरीही त्याला चोरटी वाळू विकत घेण्याची वेळ येते. बांधकाम करणाऱ्याला जर अधिकृत वाळू मिळाली तरी देखील वाळू तस्करांचा हा चोरटा व्यवसाय नियंत्रणात येईल असे अनेकांना वाटते.     


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !