BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मे, २०२२

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात दोन दिवस पाऊस !



सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. 

उन्हाळ्याची तीव्रता आणि तपमान वाढत असताना अधूनमधून येत असेलल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना हवामान खात्याने आणखी चिंता वाढवली आहे. उन्हाळा आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच मधूनच वातावरणात बदल होत आहे.  शिवारातील पिके आणि द्राक्षांच्या बागा अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेले असताना आता पुन्हा दोन दिवस पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत असतानाच काही जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसत आहे. पुढील दोन दिवसांत विजांचा कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यात ३ आणि ४ मे या दोन दिवशी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Two days rain in maharashtra including solapur) हलका आते मध्यम स्वरूपाच्या पावसासह प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 


या जिल्ह्यासाठी अंदाज 

सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यात दोन दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . 


जोरदार वारे !

३ आणि ४ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असतानाच या दरम्यान जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. हे वारे प्रतितास तीस ते चाळीस किमी वेगाने वाहणार आहे.  


हे देखील वाचा : >>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !