BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२१

नोव्हेंबरपासून स्मार्टफोन मध्ये दिसणार नाही आता 'व्हॉटस ऍप' !

 


 'व्हॉटस ऍप' बंद !

तपासा तुमचा फोन 

नवी दिल्ली : प्रचंड लोकप्रिय झालेलं  'व्हॉटस ऍप'  हे मेसेजिंग ऍप आता १ नोव्हेंबर पासून अनेकांच्या स्मार्ट फोनमध्ये दिसणार नसून बंद होणाऱ्या फोनमध्ये तुमचा फोन आहे काय? हे आत्ताच तपासून घेण्याची गरज आहे. 

 'व्हॉटस ऍप' हे इन्स्टंट मेसेजिंग ऍप आले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये या  'व्हॉटस ऍप' चा वापर मुक्तपणे केला जात आहे आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. काही क्षण  'व्हॉटस ऍप' बंद पडले तर बेचैन होणारी अनेक मंडळी आहेत पण आता अनेक मोबाईलमधून हे ऍप दिसणार नाही.  'व्हॉटस ऍप' ने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या १ नोव्हेंबरपासून काही अँड्रॉइड मोबाईल फोनमधील ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येत्या काही दिवसानंतर अनेकांचा हिरमोड होणार आहे. ग्राहकांच्या खाजगी सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.    


अँड्रॉईड आणि जुन्या iOS असलेल्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. अँड्रॉईड OS 4.1 आणि OS 10 ची सुविधा असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद होईल. परंतु जर या सुविधा असलेल्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल तर त्यासाठी केवळ  'व्हॉटस ऍप'  नव्हे तर स्मार्टफोन अपडेट करावा लागणार आहे.  'व्हॉटस ऍप'  बंद होणाऱ्या फोनमध्ये तुमचा फोन आहे का हे वेळीच तपासून पाहण्याची गरज आहे. खालीलपैकी फोन जर तुमच्याजवळ असेल तर मात्र तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. 
 
 Galaxy कोर, Galaxy Xcover2, GalaxyS 2LG ल्यूसिड 2, Optimus L5 डबल, optimusL4 II डबल, optimus F3Q, optimus f7, iPhones, iPhone 6S, iPhone 6S Plus, Apple iPhone SE, Samsung, Samsung Galaxy Trend Lite, Galaxy SII, Galaxy Trend II, Galaxy S3 mini, optimus f5, Huawei, Huawei Ascend G740, Ascend D Quad XL, Mate Ascension, Go up P1 S, Go up D2 आणि Ascension D1 Quad XL या सर्व फोनमधील  'व्हॉटस ऍप'  येत्या १ नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.  

1 टिप्पणी:

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !