BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ नोव्हें, २०२१

विठ्ठल मंदिरात जाण्याचे निर्बंध आणखी झाले शिथिल !

 


पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या आधीच विठ्ठल मंदिरातील निर्बंध आणखी सतील झाले असून आता लहान मुले आणि वृद्धानाही मंदिरातील प्रवेश खुला करण्यात आला आहे. 


कोरोनाचे आक्रमण झाल्यापासून देवाच्या दारालाही कुलुपबंद करण्यात आले होते. संकटकाळात प्रत्येकाला देव हवा असतो आणि कोरोनाच्या काळात देवच मंदिराच्या दाराला कुलूप लावून आता बसला होता आणि सगळीकडे नैराश्याचे वातावरण झाले होते. कोरोनाने भक्त आणि देव यांच्यात एक मजबूत भिंत उभी केली होती आणि संकटातील माणूस देवालाही पाहू शकत नव्हता एवढी वाईट वेळ कोरोनाने आणली होती. तिसऱ्या लाटेचे दडपण असतानाच आता कोरोना परतीच्या प्रवासाला निघाला असल्याने निर्बध हळूहळू शिथिल होत गेले आणि परिस्थिती सामान्य होत चालली आहे. मंदिरे तर उघडलीच पण आता कार्तिकी यात्रेलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देवाला भेटणारा भाविक प्रचंड सुखावला आहे. 


निर्बंध शिथिल केले असले तरी काही नियम मात्र तसेच होते त्यामुळे मंदिरात प्रवेश करणाऱ्या काही जणांवर बंधने होती. लहान मुले आणि ६५ वर्षे वयाच्या वरील व्यक्ती यांना मंदिरात जाण्यास मज्जाव होता पण हा नियमही आता शिथिल करण्यात आला आहे. जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिला यानाही आता मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे राज्यभरातून जोरदार स्वागत होत आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेताच आजपासूनच पंढरपूर विठ्ठल मंदिरात हा निर्णय अमलात आणण्यात येत आहे. या निर्णयामुळे आता विठ्ठल मंदिरात सर्वांनाच प्रवेश खुला झाला असून आता ज्यांना हवे तो आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतो. 


कार्तिकी यात्रेला परवानगी मिळतेय की नाही या धास्तीत असलेला राज्यातील भाविक आधीच समाधानी झाला आहे पण लहान मुलांना, जेष्ठ नागरिकांना आणि गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय मात्र तसाच होता. हे निर्बंधही आज उठविण्यात आणि हटविण्यात आले असून आता ज्यांना हवे ते मंदिरात जाऊ शकतात. ऐन कार्तिकी यात्रेच्या आधीच हा निर्णय झाल्याने राज्यभरात आनंद आहे. नियमांमुळे जे विठूमाऊलीच्या दर्शनापासून वंचित राहत होते त्यानाही आता दर्शनाचा लाभ मिळणार असून आजपासून विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले आहे. राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत तर करण्यात आलेच आहे पण राज्य सरकारला धन्यवाद दिले जात आहेत.     

२ टिप्पण्या:

  1. देवा दारा आड बसून कोरोना ला पळविले आणि आता दार उघडून दर्शन देतोस
    अजब तुझी माया दर्शन देती सकळां

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच देवा
    विठ्ठला तुला सर्वांची काळजी आहे
    प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्ठी पाषाणी
    तूच आहेस डॉक्टर,पोलीस, फौजी , इतर सर्व ठिकाणी तू होतास तुझं नाव घेतलं की डोळ्यात पाणी येतं आता तर लहान मुलांना व वृद्ध व्यक्ती यांना सहज दर्शन देत आहेस या जगात तुझ्या शिवाय काळजी करणारं कोणीच नाही राम कृष्ण हरी असाच तुझ्या भक्ताकडे लक्ष ठेव

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !