BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२३

सोलापूरसह विविध जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा !



✪ ✪ ✪➤✪ पुन्हा दुर्गंधी! ✪➤ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी उपनगरातील, तुंबलेल्या गटारीमुळे नागरिक हैराण, डास, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात.... तक्रारी करूनही लक्षपूर्वक दुर्लक्ष ! लोकप्रतिनिधीना वेळ नाही, ग्रामसेवकांची इच्छा नाही ! नागरिक घरातही नाक दाबूनच !

शोध न्यूज : येत्या चार दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पाऊस येण्याच्या कल्पनेने बळीराजा सुखावला आहे तर उकाड्याने हैराण झालेले नागरिक देखील पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.


वाढलेल्या उष्णतेने हा उन्हाळा अधिक चिंतेचा गेला, उन्हाळ्यात आधी अवकाळी पाऊस आणि नंतर वाढते तपमान यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच पावसाला विलंब झाला. १ जून रोजी केरळ येथे येणारा मान्सून यावेळी आठवड्याच्या विलंबाने आला आणि अखेर तो राज्यात देखील ११ जून रोजी दुपारी दीड वाजता दाखल झाला आहे. लांबू लागलेल्या पावसामुळे चिंतेचे ढग जमा होत असतानाच, राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आणि प्रत्येकाला मोठा दिलासा लाभला. काल ११ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहेच पण आता येत्या चार दिवसात देखील सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला असून येत्या चार पाच दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ११ जून पासूनच काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.  मान्सून दाखल होताच राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील  दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.


मंगळवारी देखील राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. (Weather department warning to various districts including Solapur ) बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली येथे जोरदार पाउस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात १५ जून पर्यंत अशी स्थिती राहणार आहे. पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे परंतु शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये, मशागतीची कामे पूर्ण करावीत परंतु पेरणीची घाई करू नये असे आवाहन कालच करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाच्या लहरीचा फटका बसतोय की काय ? अशी भीती आणि शंका व्यक्त होऊ लागली आहे. 


सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशीव, लातूर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गडचिरोली,मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर,  गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना कालच पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आज सोमवारी देखील राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे यात सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, नगर, नाशिक लातूर, परभणी, बीड, जालना, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, मुंबई, पालघार, ठाणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.चार दिवस राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !