BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२१

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !




अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून चार भिंतीच्या आत झालेल्या अपमानजनक बोलले असल्यास आणि याला कुणीही साक्षीदार नसेल तर हा गुन्हा ठरू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

ऍट्रॉसिटी कायद्याबाबत सतत मतमतांतरे व्यक्त होत असतात आणि या कायद्याचा गैरवापर होत असल्याचंही आरोप केला जात असतो.  पण एका खटल्यासंदर्भात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय देत ऍट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे रद्द ठरवला आहे. अनुसूचित जाती जमातीमधील कोणत्याही व्यक्तींच्या विरोधात चार भिंतीच्या आत काही अपमानजनक बोलले गेले असल्यास किंवा कोणीही साक्षीदार नसल्यास अशी बाब गुन्हा ठरणार नाही असे मत व्यक्त करीत ऍट्रॉसिटीचा गुन्हाही न्यायालयाने रद्द ठरवला आहे. 

उत्तराखंड येथील एका महिलेने हितेश वर्मा यांच्यावर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता आणि यातूनच या महिलेने ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा वर्मा यांच्या विरोधात दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात सर्व प्रकारच्या अपमानाचा आणि धमक्यांचा समावेश होत नाही, समाजासमोर पीडित व्यक्तीचा अपमान, शोषण आणि त्रास अशा घटना या कायद्यांतर्गत येतात. ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित आणि आरोपी यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींची उपस्थिती असली तरच हा गुन्हा दाखल होऊ शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे गुन्हा न घडल्याने हितेश वर्मा यांच्याविरोधातील आरोपपत्रच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. 

सार्वजनिक ठिकाण किंवा लोकांची उपस्थिती असली तरच असा गुन्हा दाखल होऊ शकतो, कोणतीही अपमानजनक कृती उघड्यावर होत असेल तर आणि अन्य लोक हे ऐकत पाहात असतील तर या कायद्याच्या अंतर्गत ही बाब गुन्ह्याच्या श्रेणीत येते असेही न्यायालयाने सन २००८ मध्ये देण्यात आलेल्या इतर निकालांचा संदर्भ देत सांगितले आहे.  सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनेक खटल्यासाठी दिलासादायक मानला जात आहे.    

1 टिप्पणी:

  1. प्रश्न विचारल्या बद्द्ल क्षमस्व सार्वजनिक ठिकाणी काही लोक उपस्थित असतिल आणि त्यांच्या समोर हे सगळं प्रकरण उघड्या डोळ्यांनी पाहुण स्वत च्या कानाणे आईकुण ते त्याच्या त्यांच्या दहशती मुळें त्यांच्या विरोधात साक्ष देण्यास नकार दिला तर पिडीतांना कसा ण्याय मिळनार

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !