BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मे, २०२२

मास्क पुन्हा बंधनकारक. त्याशिवाय करता येणार नाही रेल्वे प्रवास !


राज्यात मास्क सक्तीचा विषय चर्चेचा असतानाच रेल्वे प्रशासनाने तो पुन्हा बंधनकारक केला असून मास्कशिवाय आता रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. 


देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा यापूर्वीच सुरु झाली असून देशात आणि राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून महिन्यात चौथी लाट येऊ शकते असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय केंद्र शासनाने राज्यांना देखील सतर्क केले असून कोरोना पंचासुत्रीचे पालन करण्यास सांगितले आहे. यात मास्कचा वापर करण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या  आहेत परंतु राज्यात अजून कोरोना रुग्णांची फारशी वाढ नसल्याने राज्य सरकारने राज्यात अद्यापतरी मास्क वापरणे सक्तीचे केलेले नाही. कोरोनाचे रुग्ण वेगाने कमी झाल्याने राज्य शासनाने कोरोना निर्बंध हटवले आहेत परंतु गरज पडल्यास पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते असे देखील सांगण्यात आले आहे. राज्यात अद्याप ही सक्ती नसली तरी रेल्वेने मात्र मास्क बंधनकारक केला आहे. 


भारतीय रेल्वेकडून कोरोना संदर्भात पुन्हा जनजागृती करण्यात येत असून खबरदारी म्हणून रेल्वे प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक अर्थात सक्तीचे केले आहे. मास्क आणि कोरोना संबंधित असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे देखील बंधनकारक केले आहे. रेल्वेचे कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) नीरज शर्मा यांनी तसे पत्र जारी केले आहे (Mask Mandatory During Railway Travel)त्यामुळे आता रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर मास्क आणि अन्य उपाय करणे आवश्यक झाले आहे. 


स्थानकातही प्रवेश नाही !
रेल्वे प्रवासाच्या दरम्यान मास्क सक्तीचा केलेला आहेच परंतु मास्कशिवाय रेल्वे स्थानकात देखील प्रवेश दिला जाणार नाही. रेल्वे बोर्डानेच सर्व विभागांना कोरोना एसओपी पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर रेल्वेने नियम आणि निर्बंध शिथिल केले होते त्यानंतर मास्क वापर देखील थांबला होता. 


राज्यात सक्ती नाही पण --
कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागताच मास्क सक्ती हटविण्यात आली आहे पण सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे आवाहन मात्र करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार हे मास्क सक्ती उठविण्यात आली तरी आज देखील मास्क वापरत आहेत. कोरोनाची चौथी लाट चर्चेत असली तरी खबरादारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रुग्ण अधिक प्रमाणात वाढले तर मास्क सक्ती राज्यभर लागू शकते.   


हे देखील वाचा >>>





 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !