BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मे, २०२२

'खून का बदला खून' ! पुतण्याच्या खुनाच्या आरोपातून चुलता, चुलती निर्दोष !




पंढरपूर : 'खून का बदला खून' असे म्हणत खुनाचा बदला घेण्यासाठी पुतण्याचा खून केल्याच्या आरोपातून मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील तिघांची पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने  निर्दोष मुक्तता केली आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील चाळीस वर्षीय नवनाथ उत्तम शिंदे  यांचा आंधळगाव येथे खून झालेला होता. आंधळगाव येथील  परमेश्वर रावसाहेब शिंदे यांचा  लोखंडी टॉमीने मारून खून झाला होता. या प्रकरणी नवनाथ माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक देखील करण्यात आली होती. नवनाथ माने हा जेलमधून बाहेर आल्यानंतर तो आंधळगाव येथून खवे येथे राहण्यासाठी गेला होता. ७ ऑगस्ट २०१९ रोजी तो मावस भाऊ विकास शिंदे याच्यासोबत मावशीला भेटण्यासाठी म्हणून आंधळगाव येथे आला होता. यावेळी काठीने मारून नवनाथ याचा खून करण्यात आला होता. 


परमेश्वर शिंदे याचा खून झाल्याने खून की बदल खून म्हणून नवनाथ शिंदे याचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता आणि हा खून चुलता रावसाहेब शंकर शिंदे, चुलती पार्वती शिंदे आणि मुलगी नंदिनी शिंदे यांनी केल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश होता. विकास शिंदे यांनी याबाबत मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीना अटक केल्यानंतर यातील पार्वती आणि नंदिनी शिंदे याना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता परंतु रावसाहेब शिंदे याना जामीन न मिळाल्याने गेल्या तीन वर्षांपासून ते तुरुंगातच होते. 

 
तिघेही निर्दोष 
सदर खटल्याची सुनावणी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र नायालयात झाली आणि न्यायालयाने रावसाहेब शिंदे, पार्वती शिंदे, नंदिनी शिंदे या तिघांचीही निर्दोष मुक्तता  केली आहे . आरोपी असलेले रावसाहेब शिंदे हे मयताचे चुलते आणि पार्वती शिंदे या मयताच्या चुलती आहेत. 


पुराव्यात विसंगती 
या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वतीने ऍड. दत्तात्रय यादव यांनी बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद आणि पुराव्यातील विसंगती याचा विचार करून न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. (Revenge of murder, Innocent release of the three) प्रत्यक्ष साक्षीदार, डॉक्टर आदींच्या साक्षी या खटल्यात नोंदविण्यात आल्या.  




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !