BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ मे, २०२२

नामांकित पतसंस्थेत तब्बल वीस लाखांचा अपहार !

 


मंगळवेढा : येथील नामांकित असलेल्या तुळजाभवानी पतसंस्थेत २० लाख ४४ हजार २९३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही वर्षात तालुक्यातालुक्यात पतसंस्था स्थापन होतात आणि काही दिवसात ठेवी गोळा करून त्या बंद पडतात. यामुळे ठेवीदार अडचणीत येतात. क्वचितच पतसंस्था वर्षानुवर्षे चालू असतात. अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांचा पतसंस्थावरील विश्वास उडताना दिसतो आणि चांगले काम करणाऱ्या पतसंस्था देखील अडचणीत येतात. तुळजाभवानी पतसंस्था ही मंगळवेढ्यातील मोठी पतसंस्था मानली जाते. सदर पतसंस्थेतील चार कर्मचाऱ्यांनी नावे पावात्यावर सही न घेता, मुदत संपलेल्या आणि मुदत ठेवीच्या पावत्या न जोडता २० लाख ४४ हजार २९३ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर प्रकरणी प्रथम अप्पर लेखा परीक्षक श्रेणी २ प्रशांत नामदेव सूळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तुळजाभवानी पतसंस्थेचे १ एप्रिल १३ ते ३१ मार्च २१ या काळातील लेखा परीक्षण करण्यासाठी प्रशांत सूळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार सूळ यांनी लेखा परीक्षण करून सहाय्यक निबंधक यांना आपला अहवाल सादर केला होता. १ एप्रिल १३ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत गंभीर त्रुटी देखील आढळून आल्या होत्या. (Fraud of millions in credit unions) नावे पावत्यावर खातेदारांची सही नसणे, मुदत संपलेल्या आणि मुदतपूर्व मोडण्यात आलेल्या ठेव पावत्या न जोडताच आणि संस्थेत जमा न करताच शिल्लक कमी दाखवून हा अपहार केल्याचे म्हटले आहे.  


यांच्यावर गुन्हा दाखल !

तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक य्होगेश  पांडुरंग जाधव, तत्कालीन क्लार्क तानाजी जगन्नाथ मिसाळ, वीरेंद्र गोपाळ कुंभारे तसेच तत्कालीन व्यवस्थापक चंदकांत शिवाजी भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !