BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ मे, २०२२

एस. टी. बस भल्या सकाळी दरीत कोसळली !

 


ब्रेकिग : राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस पालघर येथील वाघोबा खिंडीत कोसळली असून यात पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून केला जाणारा प्रवास सुरक्षित मानला जातो पण अलीकडे एस. टी चे देखील अपघात होताना दिसत आहेत. भुसावळ - भोईसर मार्गावर असलेल्या पालघरच्या वाघोबा खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस उलट्या अवस्थेत कोसळली असून या अपघातात १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पालघर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  भल्या सकाळी हा मोठा अपघात झाला असून चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (State Transport Corporation bus accident) मद्यधुंद अवस्थेत बस चालक अत्यंत वेगाने बस चालवीत असल्याचा दावा जखमी झालेल्या प्रवाशांनी केला आहे. 


नाशिक येथे या बसचा चालक रातराणी बस सेवेंतर्गत बदलण्यात आला होता परंतु या चालकाने मध्यपान केले होते असे प्रवाशी सांगत आहेत. भरधाव वेगाने बस चालवत असताना पालघरच्या अलीकडेच वाघोबा घाटात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळली. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याला बस चालवू देवू नये असे आम्ही कंडक्टरला सांगत होतो पण कंडक्टरने दुर्लक्ष करून चालकाचीच बाजू घेतली त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे जखमी झालेल्या प्रवाशांचे म्हणणे आहे. 

 

बसमध्ये २५ प्रवासी 

भुसावळ - पालघर ही राज्य परिवहन महामंडळाची रातराणी बस नाशिकवरून निघाली होती आणि या बसमध्ये २० ते २५ प्रवाशी प्रवास करीत होते. वाघोबा घाटातील एका वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटून बस उलटी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !