BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मे, २०२२

प्रख्यात क्रिकेटपटूचे अपघाती निधन !

 


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वादळी खेळाडू अँड्रयू सायमंड याचे वयाच्या ४६ वर्षी अपघाती निधन झाले असून क्रिकेट जगतासाठी ही एक अत्यंत वाईट बातमी आहे. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेटसंघाचा ऑल राउंडर माजी क्रिकेटखेळाडू सायमंड याचा रात्री टाऊन्सविले येथे कार अपघात झाला आणि या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. जखमी सायमंडला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याला वाचविण्याचा शर्थीचे प्रयत्न झाला परंतु अपघातात मोठा मार लागल्याने त्याला वाचविण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरले आणि त्याचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचाच माजी फिरकी गोलंदाज शेन वार्न याचेही निधन झाले होते त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट विश्वाला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. ( Cricket Star Andrew Syamonds Dies in Car Accident) चाहत्यातही शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

एलिस नदीच्या पुलाजवळ सायमंड याचा रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आणि तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. अपघत झाला तेंव्हा सायमंड हा एकटाच त्याच्या गाडीत होता. या अपघातात सायमंड याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती त्यामुळे तो वाचू शकला नाही. 


मोठी कारकीर्द 

अँड्रयू सायमंड यांची क्रिकेटमधील कारकीर्द मोठी आहे. १९९८ ते २००९ या  कालावधीत तो ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळत होता.  त्याने आपल्या कारकिर्दीत २६ कसोटी सामने, १९८ एक दिवशीय सामने, १४ टी- २० सामने  खेळले आहेत. कसोटी मालिकेत त्याने १ हजार ४६२ धावा केल्या आहेत तर एक दिवशीय स्पर्धेत त्याच्या नावावर ५ हजार ८८ धावा आहेत. टी २० मध्ये ३३७ धावा आहेत. तिन्ही प्रकारात त्याने १६५ विकेट घेतल्या असून उत्तम क्षेत्ररक्षण आणि आक्रमक खेळी यासाठी तो प्रसिद्ध होता.  


वादामुळेही चर्चेत !

मैदानावर खेळाडू म्हणून त्याचा लौकिक होता परंतु विविध वादामुळे देखील तो सतत चर्चेत राहिला आहे. भारतीय क्रिकेट खेळाडू हरभजनसिंग आणि सायमंड यांच्यात २००७-०८ मध्ये झालेला वाद आज प्रत्येक प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मंकीगेट नावाने हे प्रकरण ओळखले जात आहे. वांशिक टिपण्णी केल्याचा आरोप सायमंड याने हरभजन याच्यावर केला होता आणि हे प्रकरण सिडनी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. 


हे देखील वाचा :

  

अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !