BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मे, २०२२

सोलापूरसह राज्यातील ९ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !



पुणे : अंदमानात मान्सून दाखल होत असतानाच महाराष्ट्रात देखील पावसाचा इशारा दिला असून चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 


यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक असून काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट असे विचित्र हवामान सतत राहिले आहे. उष्माघाताचा देखील मोठा त्रास सहन करावा लागत असून तापमान सतत वाढते असल्याने कधी एकदा पावसाला सरुवात होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशी परिस्थितीत आगामी पावसाळा चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. स्कायमेट या हवामान संस्थेनेही यंदा भरपूर पाऊस होणार असल्याचाच अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देखील या बातमीने दिलासा दिला असून शेतकरी आनंदित आहेत. त्यातच यंदा पावसाला लवकर सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. त्यानुसार अंदमान आणि केरळ येथे नियमित वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार आहे.


आगामी २४ तासात मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि बंगाल उपसागरात दक्षिण पूर्व भागात होऊ शकते असे अनुमान आहे. याच परिस्थितीत केरळ किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेगाने प्रगती करीत असलेला मान्सून येत्या २४ तासात अंदमान, निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. (Chance of four days of torrential rain) येत्या पाच दिवसात जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.  


नऊ जिल्ह्यांना अलर्ट 

सोलापूरसह राज्यातील नऊजिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला असून आज दिनांक १६ ते १९ मे या कालावधीसाठी हा अलर्ट आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी  या जिल्ह्यात चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, बीड या जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  


पावसाची हजेरी 

भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसाने झोडपून काढले आहे. अचानक येत असलेल्या या अवकाळी पावसाने पिकांना मोठा धोका उत्पन्न झाला आहे. या परिसरात धान पीक कापणीला आले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.   


२४ तासात अंदमानात !

सद्या बंगालच्या उपसागरात असलेल्या 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असून नैऋत्य मोसमी वाऱ्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे मान्सून दाखल होण्यात अडथळा उरणार नाही. दक्षिण अंदमान आणि बंगाल उपसागरावर मान्सून १५ मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज आधी व्यक्त केला होता. अंदमानात आगामी २४ तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रत्येकवर्षी  साधारणत: १८ ते २० मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होत असतो, यावेळी मात्र अनुकूल परिस्थितीमुळे पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Monsoon in two days in the Andamans) मध्य पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमानचा समुद्र, अंदमान - निकोबार बेटाचे संपूर्ण क्षेत्र पुढील २४ तासात मान्सून व्यापून टाकण्याची शक्यता आहे. 


केरळमध्येही लवकर 

मान्सूनच्या या प्रगतीमुळे केरळमध्येही मान्सून लवकर म्हणजे वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवाना हा मोठा दिलासा आहे.  मान्सूनच्या प्रगतीत काहीच अडथळे निर्माण झाले नाहीत तर राज्यात आणि देशभरात यावर्षी वेळेत पाऊस होऊ शकेल. जून महिन्यापासूनच चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने या आधीच व्यक्त केला आहे. 


हे देखील वाचा : >>

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !