BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मे, २०२२

जुगार खेळताना माजी सरपंचांसह आठ जण सापडले !



मंगळवेढा : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी सरपंचांसह आठ जण जुगार खेळताना रंगेहात सापडले असून एक लाख वीस हजाराचा ऐवज जप्त करण्यात आल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे घडली आहे./p>


प्रत्येक गावाला एक चेहरा असतो आणि प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख असते तसे मंगळवेढा शहर आणि तालुक्यात जुगार खेळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. वास्तविक जुगार हा प्रकार सगळीकडेच आहे आणि लोक वेळ घालविण्यासाठी असे पत्ते खेळत बसलेले असतात. ग्रामीण भागात तर याचे प्रमाण अधिक आहे. परंतु पैशावर अथवा अन्य कुठल्या बाबीवर पत्ते खेळणे हा जुगार मानला जातो आणि त्याला कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. मंगळवेढा येथे शासकीय कर्मचारी, अधिकारी जुगार खेळताना याआधीही अनेकदा पोलिसांना सापडले आहेत पण आता गाव शहाणे करण्याची जबाबदारी असलेले आणि कधीकाळी गावाचा कारभार सांभाळलेल्या माजी सरपंचांसह काही जण जुगार खेळताना पोलिसांच्या छाप्यात आढळून आले आहेत. 


मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळत असताना माजी सरपंच यांच्यासह आठ जण रंगेहात सापडले आहेत. त्याठिकाणी रोख रक्कम आणि दोन दुचाकी असा एक लाख वीस हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय, हातभट्टी दारू, मटका असे विविध अवैध तेजीत असताना पोलिसांना गावातील लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांच्यावर थेट कारवाई केली. जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (
Case-filed-against-eight-gamblers) एक वस्तीवर पत्राशेडच्या आडोशाला काही जण पत्ते खेळत बसले होते.  


आठ जणांवर कारवाई 
कचरेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात माजी सरपंचांसह आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. कचरेवाडी येथील या छाप्यात हनुमंत रावसाहेब कोळेकर, मायाप्पा अंकुश माने, भिकू सोपान काळुंगे, नवनाथ धर्मा माने, करण कालिदास कळसगोंडे, आप्पा सदाशिव जांभळे, नंदू पांडुरंग कोळेकर, सतीश भारत कळसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


येथेही कारवाई व्हावी 
मंगळवेढा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असताना पोलिसांनी मंगळवेढा तालुक्यात खुले आम सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर आणि वाळू तस्करावर देखील अशीच कारवाई करावी अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. मंगळवेढा तालुक्यातील अवैध व्यवसायावर मोठी चर्चा कायम सुरु असते परंतु ते सगळेच अवैध व्यावासायीक पोलिसांच्या जाळ्यात का सापडत नाहीत ? असा सवाल देखील नेहमी उपस्थित होत असतो. 


हे देखील वाचा >>>


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !