BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मे, २०२२

चिंताजनक : एकाच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोना !



मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच डेहराडूनमधील एकाच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने अधिक चिंता निर्माण झाली आहे. 


कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने दिलासा मिळाला आणि राज्यातील निर्बंध देखील कमी झाले आहेत पण पुन्हा मास्क सक्तीचा विषय चर्चेला आला आहे. कोरोना पूर्णपणे संपण्याच्या आधीच चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली आणि हळूहळू कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत चालली आहे. केंद्र शासन आणि  राज्य शासन याबाबत सतर्क झाले असून सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पुन्हा मास्क सक्ती  होण्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.  ( Corona patients will increase in Maharashtra) अर्थात याची काळजी करण्यापेक्षा वेळीच दक्षता घेण्याच्या अधिक गरज निर्माण झालेली आहे. 


तिसरी लाट ओसरताच बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आणि आगामी शैक्षणिक वर्ष नियमितपणे सुरु होण्याची अपेक्षा असताना देशात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. डेहराडूनमधील एकाच शाळेतील १६ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर आता डेहराडून येथे ही धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. एका शाळेतील १६ विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने अन्य शाळा देखील दक्ष झाल्या असून १६ बाधित विद्यार्थ्यांना शाळेतच तयार करण्यात आलेल्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या आधी नैनिताल येथील ८५ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. 


विभागावर नवे रुग्ण 

मुंबई विभागात १३८ नवे रुग्ण आढळले असून त्या खालोखाल पुणे विभागात ४१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात हे ४१ नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक विभाग - २, कोल्हापूर विभाग- २, नागपूर विभाग - ३, अकोला विभाग - १ असे नवे रुग्ण असून लातूर, औरंगाबाद विभागात मात्र एकही नवा रुग्ण आढळला नाही.  


बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के 

कोरोना रुग्णांची वाढ होत असली तरी राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. कोरोना मृत्यू दर १.८७ एवढा आहे. काल नव्या १८८ रुग्णांची भर पडली असून सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ४९ वर पोहोचली आहे. 


दक्षतेची गरज 

कोरोना रुग्ण वाढत असताना केवळ चिंता करण्यापेक्षा शासन आणि प्रशासन यांची मार्गदर्शक तत्वे अमलात आणणे अधिक गरजेचे असून वेळीच दक्षता घेतल्यास कोरोनाच्या संकटाचा प्रभाव नक्की कमी करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकानेच कोरोना रोखण्यासाठी योगदान देणे अत्यावश्यक ठरणार आहे. 


हे देखील वाचा >>>


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !