BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२२

सोलापूर जिल्ह्यात एस टी बस ला मोठा अपघात !




सोलापूर : खाजगी वाहनांचे अपघात सतत होत असताना आज राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मोठा अपघात सोलापूर जिल्ह्यात झाला असून काही  प्रवासी जखमी झाले आहेत.


रस्ते रुंद आणि सिमेंटचे झाल्यापासून जिल्ह्यातील सर्वच रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे परंतु खाजगी वाहनांचे अपघात होताना दिसते. आज मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला असून प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य परिवहन महामंडळांच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसू लागल्या आहेत. कर्मचारी संपामुळे लालपरीची चाके पाच महिने थांबून होती त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आणि प्रवाशांची देखील प्रचंड गैरसोय होत होती. आता कुठे महामंडळाची गाडी रुळावर येवू लागली होती तोच सोलापूर जिल्ह्यातील दुधनी मार्गावर बसचा मोठा अपघात झाला आहे. 


बबलाद परमानंद तांड्यावरून सदर बस कलप्पावाडीकडे निघाली असताना सोलापूर आगारातील बसचा अपघात झाला. कलप्पावाडी गावापासून केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर आल्यावर एस टी चा हा अपघात झाला. सदर बसमध्ये पन्नास ते साठ प्रवाशी प्रवास करीत होते. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि धावती बस रस्त्याजवळच्या शेतात जाऊन उलटली. अचानक घडलेला हा प्रकार पाहून प्रवासी गोंधळून आणि घाबरून गेले. प्रवाशांनी आरडाओरडा केला परंतु बस सरळ शेतात जाऊन उलटी झाली. बसमधील प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. (Bus accident in Solapur district) सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही परंतु सहा प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.  


लोक मदतीला धावले !
कलप्पावाडी गावाच्या जवळच अपघाताची ही घटना घडल्याने गावातील लोक घटनास्थळी धावले. माजी सभापती महेश जानकर हे एका विवाहासाठी जात असताना त्यांनी अपघाताचे दृश्य पहिले. जानकर यांनी थांबून जखमी प्रवाशांची चौकशी केली तसेच त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. गावातील अन्य काही मंडळीनी देखील प्रवाशांना मदत केली. 


हे जरूर वाचा : >>>


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !