BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२२

बारा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट !

 



पुणे : राज्यात कालपासून पावसाने धिंगाणा घातला असून बारा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पुन्हा अलर्ट दिला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात आणखी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

 
कडक उन्हाळ्याचे चटके बसत असतानाच अवकाळी पावसाने अधूनमधून हजेरी लावलेली आहे. कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पाऊस असे विषम हवामान राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता यावर्षी पावसाळा वेळेआधीच सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून नियमित वेळेपूर्वीच तो अंदमानात दाखल झाला असून देशात देखील वेळेआधी येणार असल्याचे हवामान विभाग सांगत आहे. दरम्यान अवकाळी पावसाचा तडाखा बसू  लागला असून काल राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या वादळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात दाणादाण उडाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान कालच्या वादळी पावसाने झाले आहे. उन्हाळ्यातल्या या पावसामुळे वातावरण बदलून गेले असून आणखी नुकसानीची टांगती तलवार कायम आहे. हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


भारतीय हवामान विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर २१ मे पर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. मोसमी पाऊस दोन दिवसात दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात आणि अंदमान समुद्र तसेच बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे. (Rain alert for twelve districts in Maharashtra) दरम्यान राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व हवामान तयार होत असून त्यामुळे पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

 
बारा जिल्ह्यांना अलर्ट !
पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात २१ मे पर्यंत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या जिल्ह्यात काल १९ मे रोजी अनेक ठिकाणी पाऊस झाला असून आजही पावसाळी वातावरण कायम आहे. 


नुकसान आणि गारवा 
कालच्या अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वारे आणि पाऊस यामुळे पिके आडवी झाली आहेत तर द्राक्षबागा, आंबा यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्यांना मात्र दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळू लागले आहे.


वेळेआधी मान्सून !
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी वेळेच्या आधीच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. केरळमध्ये २६ मे पर्यंत पाऊस दाखल होऊ शकतो तर तळकोकणात २७ मे ते २ जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !            



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !