BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ मे, २०२२

अजितदादांनी काढला अधिकाऱ्यांवर "जाळ" !

 



पुणे : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले असून "मला बोलावताना दहा वेळा विचार करा" या शब्दात समज दिली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे काही चुकीचं दिसलं की कुणालाच सोडत नाहीत. पक्षाचा कार्यकर्ता असो, अधिकारी असो किंवा सहकारी मंत्री असो, रोखठोक बोलून ज्याची चूक त्याच्या पदरात घालतात. अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख महाराष्ट्राला आहे. चांगले काही केले असेल तर तोंडभरून कौतुक देखील ते करतात आणि काही खटकले तर जाहीरपणे धुलाई देखील ते करतात. यावेळी समोर कोण आहे याचा विचार ते कधीच करताना दिसत नाही. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे ते काही वेळा राजकीय अडचणीत देखील आले आहेत आणि बोलताना विचार करून बोलावे असा सल्ला ते नेहमी देत असतात. (Ajit Pawar got angry with the officers ) अधिकारी चुकले तर त्यांना मात्र ते सोडत नाहीत हे महाराष्ट्राला माहित आहे आणि आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला. 


पुण्याच्या कृषी महाविद्यालयात गोधन २०२० देशी गोवंश प्रदर्शनाचे उद्घाटन उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. अजितदादा यांनी केवळ फीत कापून जाण्याऐवजी तेथील स्टॊल आणि गोठ्यांची पाहणी केली. कार्यक्रमाला आल्यावर त्यांनी थेट एका गोठ्याकडे आपला मोर्चा वळवला आणि पाहणी केली. अजितदादा यांनी पूर्वी दूध उत्पादक आन शेतीचे काम केलेले आहे त्यामुळे त्यांना बारकावे माहित आहेत. गोठ्याजवळ गेल्यावर त्यांना आतील जमिनीचा स्तर समांतर नसल्याचे दिसले आणि अनेक ठिकाणी बांबू देखील तुटलेले दिसले. हा प्रकार पाहून दादा संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. 


आरे हे काय ?

गोठ्याची एकंदर अवस्था पाहताच अजितदादा अधिकाऱ्यांना म्हणाले, "अरे ही काय ? तुम्हीं अधिकारी मंडळींनी मला बोलण्याच्या आधी दहा वेळा विचार करा ! माझा काटेवाडी येथील आणि बारामतीमधील गोठा येऊन पहा ... आवड असायला लागते, आवड असल्याशिवाय काही होत नसते"  अधिकाऱ्यांची जोरदार कानउघाडणी सुरु झाली तेंव्हा अनेकांना घाम पुसायचे देखील भान राहिले नाही !


--- आणि हशा पिकला !

अजितदादा संतापल्यामुळे वातावरण गंभीर झाले होते पण याच वेळी छबूबाई कामठे यांच्या निमित्ताने सगळे वातावरण बदलून गेले. प्रकल्प यंत्रावर गेल्या चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या छबूबाई आणि तीन महिला प्रदर्शनाच्या ठिकाणी हजर होत्या. त्यांच्या प्रकल्पाजवळ अजितदादा पोहोचले तेंव्हा तेथील महिलांनी फोटो काढण्याचा आग्रह धरला. यावेळी अजितदादा म्हणाले, "तुम्ही कुठल्या ? एकदम नटून थटून आज आलात... हातावर मेंदी पण काढलीय की !" यावेळी एकदम हशा पिकाला आणि सगळे वातावरण बदलून गेले ! 


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !