मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनाच धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून रेणू शर्मा नावाच्या महिलेस अटक करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक हे एका महिलेच्या तक्रारीवरून अडचणीत आलेले असताना आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना इंदूरच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण समोर आले आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी नाही दिली तर बलात्कार केल्याची तक्रार करीन अशी धमकी या महिलेने धनंजय मुंडे यांना दिली अशा हा गुन्हा आहे. खंडणी मागणारी आणि बलात्काराची धमकी देणारी ही महिला इंदूर येथील आहे. या महिलेने मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी बलात्काराची तक्रार केली होती पण त्यानंतर या महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.
ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आंतरराष्टीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन आला आणि या महिलेने धनंजय मुंडे यांना बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी दिली आणि त्यासाठी पाच कोटींची खंडणी मागितली. पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल देण्यात यावा असा तगडा या महिलेने मुंडे यांच्याकडे लावला आणि नाही दिले तर बलात्कार केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देवू असे सांगितले शिवाय सोशल मीडियावर देखील बदनामी करण्याची धमकी देण्यात आली (Woman threatens minister Dhananjay Munde) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
करुणा शर्मा प्रकरण !
करुणा शर्मा (Karuna Sharma) प्रकरण अलीकडेच राज्यभर चर्चेचे ठरले होते. माध्यमांच्या समोर देखील शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या प्रकरणाने मुंडे यांची डोकेदुखी वाढलेली होती, त्यानंतर खंडणीचे प्रकरण समोर आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
रेणू शर्माला अटक
धनंजय मुंडे यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून रेणू शर्मा या महिलेला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕शर्यत लावली आणि तरुणाचा गेला जीव !
- ⭕धावत्या कारला आग : सोलापूर जिल्ह्यातील घटना !
- ⭕सोलापूरच्या माजी मंत्र्यांनी वाचली आपल्याच मृत्यूची पोस्ट !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !