मावळ : मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला असून या अपघातातून त्या बचावल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ येथे अपघाताची ही घटना घडली.
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत मोठे नाव असलेल्या किशोरी शहाणे यांची 'माहेरची साडी' या चित्रपटातील भूमिका अजूनही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अलीकडच्या काळातील त्यांचा 'क्लासमेट' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. नुकत्याच त्या मराठी 'बिग बॉस' मध्येही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. अनेक दर्जेदार चित्रपटातून समर्थपणे अभिनय केलेल्या किशोरी शहाणे यांनीच फेसबुक पोस्ट लिहून आपल्या अपघाताची माहिती दिली आहे तसेच त्यांनी देवाचे देखील आभार मानले आहेत. मावळ येथे एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे परंतु या अपघातातून त्या सहीसलामत बाहेर आल्या आहेत.
अभिनेत्री किशोरी शहाणे आपले पती दीपक वीज यांच्यासोबत एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातातून किशोरी शहाणे या मात्र थोडक्यात बचावल्या आहेत. गाडीला अपघात झाला असला तरी किशोरी शहाणे या सुखरूप आहेत, 'आमच्या गाडीला अपघात झाला आहे, या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाचं आशीर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको राखे साईया, मार सके ना कोय" असे देखील त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !