BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ एप्रि, २०२२

राज्यात ऐन उन्हाळ्यात कोसळणार गडगडाटी पाऊस !

 


मुबई : उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाचा राज्यात ऐन  उन्हाळ्यात गडगडाटी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Warning of unseasonal rains in Maharashtra) काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.


कडक उन्हाळा आणि त्यात उष्णतेची लाट यामुळे लोक हैराण झाले असून उन्हाचा तडाखा भलताच वाढला आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही निर्माण झालेला असून राज्यात तीन शेतकरी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेले आहेत. मार्च महिना हा तर विक्रमी उन्हाळ्याचा गेला असून एप्रिलमध्येही सरासरी तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने याआधीच जाहीर केले आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट असह्य होत असून तापमान ४२ अंश सेल्सियसच्या पुढे नोंदले जात आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आता जोरदार वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होणार असल्याने तापमानात काही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पाऊस पडणार असून यावेळी जोरदार वारे देखील वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज पाऊस होण्याची शक्यता असून यामुळे तापमानात घट होऊन उकाडाही कमी होणार आहे. सदर दोन्ही जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज आहे. ५ आणि ६ एप्रिल रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन होणार असून जोरदार वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या चारही जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात होणाऱ्या या पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता असून वाढत्या उकाड्यापासून थोडासा तरी दिलासा मिळणार आहे.


हे देखील वाचा :

        

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !