BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ एप्रि, २०२२

साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यास रस्त्यावर लुटले !



मंगळवेढा : किराणा माल खरेदी करून आपल्या घराकडे निघालेल्या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यास रस्त्यावर अडवून लुटले असल्याची (Mangalawedha Crime) धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील विविध तालूक्यात चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. घरे फोडली जात आहेत, रस्त्यावर फसवणूक करून लुटले जात आहे पण आता रस्त्यावर अडवून लुटण्याचा प्रकार होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवेढा - अकोले मार्गावर युटोपियन शुगरच्या कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल असा ४९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले आहेत.  


युटोपियन शुगर मंगळवेढा या कारखान्यात हेल्पर दत्तात्रय आप्पा मोटे यांच्याबाबत ही घटना घडली आहे. मोटे हे गणेशवाडी मार्गाने आले आणि त्यांनी इंडियन ऑइल पंपावरील मशीनवरून पैसे काढले. त्यानंतर त्यांनी दीड हजार रुपयांचा किरणा माल खरेदी केला आणि परत निघाले. ते आपल्या घरी जात असताना अकोले मार्गावर विना क्रमांकाची एक चार चाकी गाडी पाठीमागून आली. पांढऱ्या रंगाच्या या इंडिका गाडीचे त्यांच्या दुचाकीला आडवे जावून रोखले. अचानक इंडिका कार आडवी घातल्याने मोटे यांनी आपली दुचाकी थांबवली. त्याक्षणीच कारमधून दोघेजण खाली उतरले आणि दुचाकीची चावी काढून घेतली. 


अचानक घडलेल्या या प्रकाराने मोटे गोंधळून गेलेले असतानाच एकाने त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला तर दुसऱ्याने त्यांचा गळा पकडून पॅन्टच्या खिशात हात घातला आणि ३९ हजार ९०० रुपये काढून घेतले. यावेळी एकाने कारच्या दिशेने पाहात 'समीर, हत्यार लेके आव' असे सांगितले. या घटनेने घाबरून गेलेले मोटे हे काहीच करू शकत नव्हते. त्यांना लुटून ही गाडी पुन्हा मंगळवेढ्याच्या दिशेने निघून गेली. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी करून आरोपीना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते हाती लागले नाहीत. या घटनेने मात्र तालुक्यात दहशत निर्माण केली ( Road Robbery in Mangalvedha taluka)असून दुचाकीवरून प्रवास करणे देखील आता धोक्याचे ठरू लागले असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.


हे देखील वाचा :

सोलापूर तापले, पारा पोहोचला ४३ अंशाच्या जवळ !

        

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !