BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ एप्रि, २०२२

पंढरपूर तालुक्यात एका रात्रीत तीन घरफोड्या !

 


पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चोऱ्यांचे सत्र अजूनही थांबलेले नसून पटवर्धन कुरोली येथे एका रात्रीत तीन घरफोड्या होण्याची घटना घडल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चोरांची दहशत ( Pandharpur Crime) निर्माण झाली आहे. 


पंढरपूर शहर आणि तालुक्यात गेल्या काही काळात चोरी, घरफोडीसारख्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलीस या चोरांना पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करीत आहेत. चोराना गजाआड पाठवत आहेत परंतु चोरट्यांचे मनोधैर्य काही केल्या ढासळत नसल्याचे दिसत आहे. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे पुन्हा चोरांनी धुडगूस घातला आणि एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी केली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने यांची चोरी करण्यात आली आहे, चोरीच्या या घटनात ३ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


सद्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. घरात झोपणे अशक्य होत असल्यामुळे नागरिक घराबाहेर अथवा गच्चीवर झोपत आहेत. अशाच प्रकारे घराला कुलूप लावून अंगणात झोपलेल्या माजी सैनिकाच्या घरात रोपळे येथे अलीकडेच चोरी झाली होती. आता पटवर्धन कुरोली येथे देखील असाच प्रकार घडला आहे. पुनर्वसन गावठाण परिसरातील नंदकुमार तवटे हे घरात उकाडा असल्याचे गच्चीवर जाऊन झोपले होते. त्यांच्या घराचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याच्या चार अंगठ्या, मंगळसूत्र, रिंगा, झुबे असे ९६ हजार रुपये किमतीचे दागिने आणि १ लाख ५७ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. 


तवटे यांच्या घरातून एकूण २ लाख ५३ हजाराची चोरी झाल्यानंतर देवडे रस्त्याजवळ राहणारे विश्वास पाटील यांच्या घरातही चोरीची घटना घडली आहे. त्यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला आणि कपाटाचा दरवाजा कटावणीने उचकटून रोख ६० हजार आणि २१ हजार रुपये किमतीची बोरमाळ असा ८१ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. तिसरी चोरी नवनाथ गोरख नाईकनवरे यांच्या घरात करण्याचा प्रयत्न केला पण तेथून मात्रे चोरांना रित्या हाताने परतावे लागले आहे. (Three thefts in one night in Pandharpur taluka) एका रात्रीच लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील नागरिकात चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. 


हे वाचले काय ? :   (बातमीवर क्लिक करा )

  🅾️ अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !