BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ एप्रि, २०२२

चुकीचा गुन्हा दाखल, सोलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित !

 




सोलापूर : ऍट्रॉसिटीचा गुन्हा चुकीचा दाखल केल्यामुळे सोलापूर जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे याना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल ( Solapur Police) यांनी ही कारवाई केली आहे. 


पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच सोलापूरचे दोन पोलीस अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असताना जेल रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी  मोठी कारवाई करण्यात आली आहे. सन २००० ते २००३ पासून आत्तापर्यंत मुस्लिम पाच्छा पेठेतील जांबवीर मागासवर्गीय सहकारी संस्थेची जागा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे आणि ती वारसाहक्काने श्रीकांत ज्ञानेश्वर वाघमारे याना मिळाली होती. तेथे राहायला असलेल्या तिघांनी कब्जातील जागेवर तुझा काय संबंध ? आम्हाला जागा विकत दे, असे म्हणत तिघांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची फिर्याद श्रीकांत वाघमारे यांनी केली होती. उस्मान हुसेन बागवान, परवीन शेख, अब्दुल हमीद शेख यांच्याविरोधात जेल रोड पोलिसांनी ऍट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी या गुन्ह्यात चुकीची कारवाई केल्याचे तपासात उघड झाली. या प्रकारामुळे पोलीस दलाची बदनामी झाली आणि जनमानसात पोलिसांची प्रतिमा मालिन झाली असा ठपका ठेवण्यात आला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Solapur Senior police inspector suspended ) या कारवाईने सोलापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


दुसरी कारवाई !
दोन दिवसातील सोलापूर पोलिसांवरील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याने दोन अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असतानाच ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.  


हे वाचले काय ? :   (बातमीवर क्लिक करा )

   अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !         



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !