BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ एप्रि, २०२२

अपघात : पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू !

 


मोहोळ : मोहोळ - पंढरपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील दोघ्नाचा मृत्यू झाला असून लक्झरी बस आणि बोलेरो गाडीत हा अपघात झालेला आहे. 



पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर अलीकडे सतत अपघात होत असून यात प्रवाशांचे प्राण जात आहेत. सदर रस्त्याचे काम सुरु असून ते संथगतीने सुरु असल्याने वाहनधारकात प्रचंड नाराजी आहे. कुठे चांगला रस्ता आणि कुठे काम सुरु असलेला रस्ता आहे हेच लक्षात येत नसल्याने वाहनचालकाचा गोंधळ होत आहे आणि अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच नारायण चिंचोलीजवळ एस टी आणि कार यांच्यात धडक होऊन एक अपघात झाला आहे तोच आज सारोळे हद्दीतील लादे वस्तीजवळ अपघात होऊन पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मोहोळच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने चुकीच्या दिशेने जावून बोलेरो जीपला वेगाने धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. 


पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील अरुण भानुसाद केंगार आणि सुपली येथील सुरेश बबन भोसले हे दोघे एका लग्नातील नवरीला सोडण्यासाठी बोलेरे गाडी घेवून गेले होते, पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील बाळू वाघमारे यांची बोलेरो गाडी (एम एच १३ ए झेड ३९६९) घेवून सोलापूर येथे नवरी सोडण्यासाठी गेलेले होते. नवरी सोडल्यानंतर त्यांनी हळदीचा कार्यक्रम उरकला आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. ते मोहोळ तालुक्यातील सारोळे गावाच्या हद्दीत आल्यानंतर लादे वस्तीजवळ समोरून एक लक्झरी बस (ए आर ०६/ए ८४१७) वेगात आली आणि बोलेरो जीपला जोराची धडक दिली.  या अपघातात पंढरपूर तालुक्यातील अरुण केंगार आणि सुरेश भोसले या दोघांना जबर मार लागला, त्यांच्या हाताला आणि डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


बस चालक पळाला !

सदर अपघातात पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्यानंतर लक्झरी बस चालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याने या अपघाताची खबर देखील मोहोळ पोलिसांना दिली नाही. याबाबत पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील नवनाथ भानुदास केंगार यांनी  मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी लक्झरी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !