BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ एप्रि, २०२२

अजितदादा कडाडले, ' दिल्लीपुढे आजीबात झुकणार नाही' !



पुणे : महाराष्ट्र कधीही दिल्लीला टक्कर देईल, महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही अशा शब्दात अजितदादा दिल्लीवर आज कडाडले आहेत. 


महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून खडाजंगी सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. महाविकास आघाडीचे काही नेते तुरुंगात गेले असून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याबाबत सतत आरोप होत आहेत. एकूण राजकारणामुळे महाराष्ट्राचे वातावरण दुषित झाले असून सामान्य नागरिक देखील अशा राजकारणाला वैतागलेला आहे. सामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे कुणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही, केवळ सत्तेसाठी चाललेले राजकारण पाहून राज्यातील जनतेला राजकारणाची शिसारी येऊ लागली आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढून राज्यातील वातावरण तणावात नेलेले आहे. 


जुन्नर येथील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी परखडपणे आपले मत मांडले. महाराष्ट्रात रमजान सुरु आहे, राज्यात सणासुदीचे उत्सव सुरु आहेत आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जातीपातीचे राजकारण करण्यात येत आहे. रयतेचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवणूक डोळ्यापुढे ठेवली जावी आणि जातीपातीचे राजकारण करण्यात येऊ नये. देशावर संकट येते तेंव्हा महाराष्ट्र मदतीला धावून जाईल, महाराष्ट्र कधीही दिल्लीला टक्कर देईल, महाराष्ट्र कुणापुढे झुकलेला नाही आणि झुकणार देखील नाही असे रोकठोकपणे आज अजितदादा यांनी सांगितले. 


महागाई प्रचंड वाढत आहे, पेट्रोल डीझेलच्या किमती रोज वाढत आहेत गॅसच्या किमती वाढत आहेत, केंद्र सरकारने याचा विचार करण्याची गरज आहे अशा शब्दात महागाईबाबत देखील अजित पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रश्नाबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे. यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न कठीण झालेला असून अजूनही शिवारात ऊस शिल्लक आहे आणि शेतकरी अस्वस्थ आहेत. कारखाने सुरु असले तरी ऊसाला आता तुरे आले असून ऊसाचे वजन कमी होऊ लागले आहे. आपला ऊस आता कारखान्याला जाईल की नाही अशी भीती व्यक्त होत असतानाच अजितदादा पवार यांनी दिलासा दिला आहे. ऊसाची तोडणी झाल्याशिवाय कारखाने बंद केले जाणार नाहीत असे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !