BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ एप्रि, २०२२

बाप रे बाप ! भिंतीत सापडलं कोट्यवधींचं घबाड !

 



मुंबई : बाप रे बाप ! एका भिंतीत कोट्यावधींचे घबाड ! जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईत मोठे घबाड हाती आले असून दहा कोटींच्या  नोटा आणि १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


वाढत्या महागाईने सामान्य माणूस होरपळून गेला आहे आणि त्याच्या खिशात दमडी नसताना भिंतीत मात्र कोट्यावधीची रक्कम दडवली जात आहे. आर्थिक विषमतेचे हे उत्तम उदाहारण असून सरकारी अधिकारी यांच्या घरात झालेल्या कारवाईत देखील आत्तापर्यंत कोट्यावधींची रक्कम यापूर्वीदेखील आढळून आली आहे. रुपया रुपयासाठी गरीब भर उन्हातही घाम गळतो तरी तेखील त्याला पोटापुरते मिळत नाही आणि दुसरीकडे निर्जीव भिंतीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवली असल्याचे समोर येत आहे.  भारत देश एकच असला तरी या देशात गरीब आणि चोरटे श्रीमंत असे दोघ घटक या देशात असल्याचे अनेकदा समोर येते आणि सामान्य माणसांचे डोळे आपोआप विस्फारतात. 


महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईत ९ कोटी ७८ लाख रुपयांच्या नोटा आणि १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. भिंतीत आणि फरशीच्या आत ही मालमत्ता दडविण्यात आली होती पण हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. भितींत आणि फरशीखाली हे घबाड लपविण्यात आले होते. झवेरी बाजार परिसरातील चामुंडा बुलियन कंपनीच्या आवारातून जीएसटी विभागाने हे प्रचंड घबाड जप्त केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असताना जीएसटी विभागाने हा परिसर देखील सील केला आहे.  


मेसर्स चामुंडा बुलियन कंपनीची आर्थिक उलाढाल २०१९ ते २०२१ एवढ्या कालावधीत १ हजार ७६४ कोटी पर्यंत वाढल्याने जीएसटी विभागाला संशय आला. या विभागाने छापा टाकला असता या कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणीच नसल्याचे दिसून आले. एकूण शंकास्पद परिस्थिती दिसल्याने जीएसटी विभागाने अधिक बारकाईने चौकशी आणि पाहणी  सुरु केली.  ३५ चौरस मीटरच्या एका लहान जागेत एका भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड या विभागाला आढळून आली आणि अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. (Billions of rupees hidden in the wall) त्यांनी अधिक चौकशी केली असता फरशीखाली तब्बल १९ किलो वजनाच्या चांदीच्या विटा देखील आढळून आल्या आहेत.  


आयकर विभाग सक्रीय ! 

एवढे मोठे घबाड हाती लागताच जीएसटी विभागाने प्राप्तीकर विभागाला देखील याची सूचना दिली आहे आणि आता अधिक खोलात जाऊन तपास सुरु झाला आहे. ही मालमत्ता कुठून आली याचा शोध आता आयकर विभाग देखील घेऊ लागला आहे.  जीएसटी फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अशोक राजभर याला अटक करण्यात आली असून त्याने शासनासमोर सादर केलेल्या कागदपत्रात ४७५ कोटींचा खोटा व्यापार दाखविण्यात आला होता आणि यातून ८४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  

       

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !