BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मार्च, २०२२

पाऊस येणार, सोलापूर जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यांना अलर्ट !



पुणे : सोलापूर जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यांना आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Non seasonal rainfall today again) 


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असताना पावसाळ्याचे वातावरण झाले असून काल रात्रीपासून सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी रात्रीपासून हलका पाऊस होत आहे. मध्यरात्रीनंतर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत तर राज्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विजांचा कडकडाट होत सोसाट्याचे वारे देखील वाहू लागले आहे. ऐन उन्हाळ्यात येऊ लागलेल्या पावसामुळे कांदा, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतलेला असतानाच आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अधिक चिंता व्यक्त होत आहे. 


गेल्या चार पाच दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात पाऊस होत असून नंदुरबार, धुळे, नाशिक परिसरात हलक्या पावसासह गारपीठ देखील झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती आजही तशीच असून आज पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने काल सोलापूर जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता आणि त्याप्रमाणे अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. कालपासून हवामान ढगाळ असून ऐन उन्हाळ्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यात आज सूर्यदर्शन देखील झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसाचा अनुभव येत आहे. (Non seasonal rainfall today again) 


आज देखील हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासह ९ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला असल्याने शेतकरी बांधवांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर या ९ जिल्ह्यांसाठी हा अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान आहे. या जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या ९ जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सोबत मोठ्या प्रमाणात विजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी दूरचा प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडाच्या निवाऱ्याला थांबू नये असा सल्ला हवामान तज्ञांनी दिला आहे.  


रायगड, ठाणे, लातूर, उस्मानाबाद, बीड, जळगाव, धुळे, नांदेड, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  काही भागात जोरदार मेघगर्जना देखील होऊ शकतात. ऐन उन्हाळ्यात येत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असले तरी उद्यापासून राज्यातील या अवकाळी पावसाचा जोर कमी होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाट परिसरासह कोकण आणि दक्षिण महाराष्टात काही भागातील हवामान मात्र ढगाळ राहील (Weather forecast) राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाळा असला तरी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


राज्याच्या विविध भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान देखील केले आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल आणि किमान तपमानात काहीशी घट झाल्याची नोंद झाली आहे. पुणे येथे आज किमान तापमानाची १७.५ अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली आहे. सोलापूर २२.७ अंश सेल्सिअस तर  उसमंबाद १७.४, महाबळेश्वर १७.८, सातारा २२.१, कोल्हापूर २३.३, नाशिक १६.४ अंश सेल्सियस अशी किमान तापमानाची आज नोंद झाली आहे. (Yellow alert for nine districts)

हे देखील वाचा (बातमीवर क्लिक करा )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !