BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मार्च, २०२२

बोगस रासायनिक किटकनाशकांचा शेतकऱ्यांना फटका !




पंढरपूर : बोगस रासायनिक किटकनाशाकामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधींचा फटका बसला असून अलीकडेच माढा तालुक्यातील बोगस खताचे प्रकरण उघडकीस आले होते. (Pandharapur)


शेतकरी राब राब राबतो परंतु एक तर त्याच्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही आणि त्यात काही प्रवृत्ती नकली बियाणे, बोगस खते, किटकनाशके विकून आपले उखळ पांढरे करतात आणि कष्ट करणाऱ्या बळीराजाला देशोधडीला लावतात. माढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना नकली खते विकून पिकांचे मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली होती, आता असाच काहीसा प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असल्याचे समोर आले आहे.  अप्रमाणित रासायनिक किटकनाशक वापरल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील तनाळी आणि कासेगाव येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा The vineyard ) धोक्यात आल्या आहेत. 


पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शिवाजी अलदर, सुनील गवळी, यांनी 'फायरी बन' हे  किटकनाशक द्राक्षांच्या खोडाला दिले होते. त्यानंतर दहा दिवसात द्राक्ष घड आणि झाडेही वाळायला लागली असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण पाच एकरातील द्राक्ष बाग धोक्यात आली आणि सगळे घड वळून गेले त्यामुळे त्यांना सुमारे ७० लाखांचा फटका बसला आहे. परिश्रम करून आणि प्रचंड खर्च करून वाढवलेली बाग अंतिम टप्प्यात आलेली असताना झालेले प्रचंड नुकसान त्यांच्यासाठी धक्का देणारे ठरले आहे. 


कासेगाव आणि तनाळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी एमको पेस्टीसाईड कंपनीचे 'पायरी बन' हे किटकनाशक वापरले होते. त्याचा विपरीत परिणाम द्राक्ष बागांवर दिसू लागला असून शेतकरी धास्तावले आहेत. दोन गावाच्या परिसरातील सुमारे वीस एकर द्राक्षबागांना हे नुकसान सहन करावे लागत असून हे नुकसान काही कोटींचे असल्याचे सांगण्यात येत आहे.  खाजगी प्रयोगशाळेत या किटकनाशकांची तपासणी केली असता ते अप्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर कृषी विभागाने या औषधांचे नमुने आणि द्राक्षांचे घड पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले असून तेथील अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. हा अहवाल काय येतोय यावर संबंधितावर कारवाई अवलंबून असणार आहे. Counterfeit pesticides )


माढा तालुक्यातील बावी येथील काही द्राक्ष बागायतदाराना बोगस खतांचा Counterfeit fertilizers ) मोठा फटका सहन करावा लागला होता. अशा नकली खतांच्या वापराने अखेरच्या क्षणी द्राक्षांचे घड वाळून गेले होते आणि यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या खतांचे नमुने तपासणीस पाठवले होते आणि त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने खत कंपनीवर कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पंढरपूर तालुक्यात किटकनाशकांच्या बाबतीत हा प्रकार समोर आला आहे.  अप्रमाणित रासायनिक किटकनाशकांची विक्री करून शेतकरी बांधवाना फसविणाऱ्या कंपनीवर आणि स्थानिक विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे सोलापूर विभाग अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. Counterfeit pesticides losses of farmers pandharapur )

 हे देखील वाचा (बातमीवर क्लिक करा )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !